खडकवासला धरणाजवळ फरार आरोपी कडून गावठी पिस्तूल व काडतुस जप्त,पुणे ग्रामीण LCBची कामगिरी

अमोल भोसले, पुणे

ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे टिमने पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली हवेली पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्ड वरील फरार आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली की, हवेली पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी देवालेश साळुंके (वय 23 वर्ष रा.मु. संत रोहिदासनगर गणपणती मंदिर पाठिमागे ता.हवेली जि.पुणे) हा खडकवासला धरणाजवळील चौकात येथे आला असून त्याच्या कमरेला पिस्तूल सारखे हत्यार खोचले असल्याची गोपनीय बातमीदारमार्फत बातमी मिळाली. त्या ठिकाणी संशयास्पदरित्या थांबलेल्या आरोपीच्या कमरेला पिस्तूल सारखे हत्यार खोचलेले दिसले. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने शिताफीने ताब्यात घेतले.

त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला गावठी पिस्तूल व पॅन्ट उजव्या खिशात १ जिवंत काडतुस मिळून आले. आरोपीकडून ३५,१०० रुपये चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.अमोल गोरे, पो.ना. विजय कांचन, पो.ना. चंद्रकांत जाधव, पो.शि.अमोल शेडगे, पो.शि.मंगेश कदम, पो.शि,धीरज जाधव, म.पो. शि.पूनम गुंड, चा.पो.शि. दगडू विरकर यांनी कारवाई केली.

Previous articleघोडनदी पात्राच्या शेजारी असलेल्या मोटारींच्या केबल वायर चोरीला
Next articleशिक्षणा फाऊंडेशन आणि विभा इंडीया यांच्या वतीने वैद्यकीय साहित्याची मदत