घोडनदी पात्राच्या शेजारी असलेल्या मोटारींच्या केबल वायर चोरीला

 प्रमोद दांगट

घोडेगाव (ता. आंबेगाव ) येथील गोनवडी येथील घोड नदीच्या बंधाऱ्याच्या बाजूला नदी पात्राच्या कडेला शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या विद्युत पंपाच्या 21 हजार रुपये किंमतीची मोटरची केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि ९/७/२१ ते दि.१०/७/२१ रोजी च्या दरम्यान घडली आहे.या बाबतची फिर्याद शेतकरी किरण घोडेकर यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की किरण बबन घोडेकर ( वय ५४ रा.घोडेगाव ता.आंबेगाव जि. पुणे ) यांची दोन धोंडमाळ येथे शेती असून त्यांनी शेतीला लागणाऱ्या पाण्यासाठी घोडनदीच्या पात्राच्या कडेला मोटार बसवली आहे. दिनांक ९ रोजी ते शेतीला पाणी भरून मोटर बंद करून घरी आले होते. त्यानंतर दिनांक १० रोजी ते मोटर चालू करण्यासाठी गेले असता त्यांना मोटर चालू झाली नाही त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना मोटरला लावलेली केबल दिसली नाही तसेच त्यांच्या शेजारी असणारे मोटर मालक सिताराम तुकाराम काळे ( रा. धोंडमाळ ता.आंबेगाव जि. पुणे ) अनिल सखाराम दरेकर ( रा. दरेकरवाडी ता.आंबेगाव पुणे ) यांना फोन करून माहिती देत तुमच्या मोटरची केबल आहे की नाही याची खात्री करा असे सांगितले. त्यावेळी ते दोघेजण आले असता त्यांची केबल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.या शेतकऱ्यांनी त्यांच्या केबल वायर चा शोध आजूबाजूच्या परिसरात घेतला असता केबल मिळून आली नाही कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांची २१ हजार रुपये किंमतीची वायर चोरून नेली असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी याबाबत घोडेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous articleमराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या सोशल मिडिया परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी निलेश खरमरे यांची नियुक्ती
Next articleखडकवासला धरणाजवळ फरार आरोपी कडून गावठी पिस्तूल व काडतुस जप्त,पुणे ग्रामीण LCBची कामगिरी