मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या सोशल मिडिया परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी निलेश खरमरे यांची नियुक्ती

श्रावणी कामत,पुणे – मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र सोशल मिडिया परिषदेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी झी 24 तास वृत्तवाहिनीचे पुणे प्रतिनिधी निलेश खरमरे यांची नियुक्ती करण्यात आली असून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

पुणे जिल्हा पत्रकार संघाची बैठक आज बुधवार ( दि.१४ ) रोजी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजश्री छत्रपती शाहू महाराज सभागृहात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख होते.

यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, महाराष्ट्र सोशल मीडिया परिषदेचे राज्याचे मुख्य निमंत्रक बापूसाहेब गोरे,पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर,जिल्हा सरचिटणीस सतिश सांगळे , परिषद प्रतिनिधी एम जी शेलार उपाध्यक्ष सूर्यकांत किंद्रे इत्यादी मान्यवर व जिल्ह्यातील असंख्य जिल्हा संघाचे पदाधिकारी व पत्रकार सदस्य उपस्थित होते.

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पुणे जिल्ह्यासाठी भरत निगडे यांची जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी नुकतीच निवड करण्यात आली त्यांचा सन्मान व भोर तालुका पत्रकार संघाच्या बिनविरोध निवडलेल्या अध्यक्ष वैभव भुतकर , उपाध्यक्ष संतोष म्हस्के, माणिक पवार , सरचिटणीस ( सचिव पदी) स्वप्निलकुमार पैलवान , कोषाध्यक्ष (खजिनदार) पदी किरण दिघे,तर कार्यकारिणी सदस्यपदी सूर्यकांत किंद्रे, नितीन धारणे, चंद्रकांत जाधव व किरण भदे यांची निवड झाली या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी एस एम देशमुख , शरद पाबळे व बापूसाहेब गोरे यांनी उपस्थितांना संघटनात्मक विषयावर मार्गदर्शन केले.

कोरोनाचे सर्व नियम पाळून पार पडलेल्या बैठकीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या जिल्ह्यातील व राज्यातील पत्रकार व त्यांचे कुटुंबीयांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या बैठकीला बापूसाहेब काळभोर (अध्यक्ष- हवेली ता.), अनिल वडघुले ( पिंपरी चिंचवड शहर- अध्यक्ष), हणमंत देवकर (हुतात्मा राजगुरू चाकण शहर -अध्यक्ष), हेमंत गडकरी (बारामती ता.अध्यक्ष) , राजेंद्र रणखांबे ( वेल्हा,ता.अध्यक्ष.), संदीप निरजे (खेड,ता.अध्यक्ष) इत्यादी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष यांच्यासह दादाराव आढावा ( जिल्हा प्रतिनिधी ), श्रावणी कामत ( जिल्हा महिला प्रतिनिधी) आणि इतर पत्रकार संघांचे अध्यक्ष व पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य उपस्थीत होते.

बैठकीचे सुत्रसंचलन व सभेचे इतिवृत्त वाचन जिल्हा समन्वयक सुनील जगताप यांनी केले तर आभार राजेंद्र शिंदे यांनी मानले

Previous articleमंचर येथे ५० वर्षीय व्यक्तीचा गळा आवळून खून ; आरोपी फरार
Next articleघोडनदी पात्राच्या शेजारी असलेल्या मोटारींच्या केबल वायर चोरीला