लक्ष्मण दवणे यांची ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या उपाध्यक्षपदी निवड

अमोल भोसले,पुणे

सुभाष कोठारी राष्ट्रीय उपाध्यक्ष ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत लक्ष्मण दवणे यांची उपाध्यक्ष ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन महाराष्ट्र राज्य ( शाखा ) या पदावर निवड करण्यात आली. लक्ष्मण दवणे यांनी सुभाष कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०१७ ते २०२१ प्रर्यत त्यांनी संस्था वाढीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम पार पाडले आहे. त्यांनी आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष ‌तसेच पुणे जिल्हा सल्लागार ते जनसंपर्क अधिकारी अशी अनेक पदे भुषवली आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नवीन तालुका शाखा उदयास आल्या. खेड, मुळशी, मावळ, पुरंदर, काळेवाडी व पुणे जिल्हा या शाखा उभ्या करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग घेऊन तो उपक्रम यशस्वी होण्यासाठी अतोनात प्रयत्न केले.

स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदानशिबिर शाळांना मदत अशी कामे केली आहेत. १० डीसेंबर मानावाधीकार दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात मोलाचे योगदान आहे. त्याच्या ह्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांना उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन पद देऊन संस्थेने त्याचा गौरव केला आहे. त्यांना नवीन जबाबदारी साठी खुप खुप शुभेच्छा ‌यापुढील काळात ही त्यांच्याकडून मानव हीताचे कार्य घडो हीच सदिच्छा सुभाष कोठारी राष्ट्रीय उपाध्यक्ष ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन यांनी दिल्या.

Previous articleदावडी गावावर आता तिसऱ्या डोळ्यांची नजर
Next articleमंचर येथे ५० वर्षीय व्यक्तीचा गळा आवळून खून ; आरोपी फरार