दावडी गावावर आता तिसऱ्या डोळ्यांची नजर

राजगुरूनगर : विकासाचा आदर्श समोर असला तर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘नवदृष्टी’ साकार करता येते. दावडी गावातले सीसीटीव्ही कॅमेरे आज गावची दृष्टी बनले आहे. त्यांच्या साहाय्याने गावातला कानाकोपरा २४ तास नजरेखाली आला आहे. जणू गावालाच डोळे आले आहे. यापुढे कोणतेही गैरकृत्य लपणार नाही व चांगले काम दिसल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात सरपंच संभाजी घारे यांनी आनंद व्यक्त केला.

गावात निवडणुका आल्या की राजकीत स्पर्धा सुरू होते. आरोपांच्या फैरी झाडल्या जातात. मात्र ती संपली की, गटातटाचे राजकारण बाजूला सारून गावाचा विकास कसा करायचा, याचा आदर्श दावडी ग्रामपंचायतीने आजपर्यंत केलेल्या विकासकामांच्या माध्यमातून दाखवून दिला आहे.

तालुक्यातील दावडी ग्रामपंचायत विकासात्मक धोरणे राबवत विकासाकडे पाउल टाकताना दिसत आहे.
आता दावडी ग्रामपंचायतीने २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या पंधरावा वित्त आयोगाचा योग्य वापर करत गावात सीसीटीव्ही बसवले. एकूण २० ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गावातील प्रत्येक हालचालीवर आता त्यांचे लक्ष असणार आहे.प्रामुख्याने स्टेट बँक ते हायस्कूल,चिंचोशी रोड ते महालक्ष्मी मंदिर, सम्शानभूमी , हायस्कूल शाळा,जिल्हा परिषद शाळा व आरोग्य उपकेंद्र,तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, बाजारपेठ,रेशनिंग दुकान, पीडीसीसी बँक,नेटके वस्ती येथे सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.

यासाठी ३ लाख ७४ हजार रुपये इतका निधी खर्च करण्यात आला आहे.

Previous articleशिवशंभु छावा प्रतिष्ठानचे संस्थापक भरत पवळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योध्द्यांचा सन्मान
Next articleलक्ष्मण दवणे यांची ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या उपाध्यक्षपदी निवड