दोंदे गावातील ३२० नागरिकांची कोरोना अँटीजीन तपासणी

राजगुरूनगर-ग्रामपंचायत दोंदे अंतर्गत गावठाण व वाड्या वस्ती वर घरोघरी जाऊन संपुर्ण गावामध्ये कोरोना धडक सर्वेक्षण आणि नमुना तपासणी मोहिम अंतर्गत प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्तीची तपासणी आयुष प्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे आणि डॉ.भगवान पवार जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सूचनेनुसार करण्यात आले. नेहमीप्रमाणे गावातील नागरिकांनी तपासणी करून घेऊन प्रशासनास सहकार्य केले. या मोहिमेअंतर्गत गावातील ३२० नागरिकांची कोरोना अँटीजीन तपासणी केली असता ३ नागरीक कोरोना पोसिटीव्ह आढळुन आले त्यांना चांडोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सरपंच यांनी चला निर्धार करू या , सर्व ग्रामस्थांनी टेस्ट करू या, दोंदे गाव कोरोनो मुक्त होण्यासाठी सज्ज होऊ या आव्हानाला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.

यावेळी सरपंच चंद्रकांत बारणे, उपसरपंच सिद्धार्थ कोहिणकर, ग्रामसेवक निलेश पांडे आणि ग्रामपंचायत सदस्य,हनुमंत कदम,सौ.वैशाली सुकाळे उपस्थित होते


तसेच या कामी दोंदे आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सहाय्यक डॉ कुलकर्णी , वैद्यकीय अधिकारी श्रीम.भाग्यश्री पाटील आरोग्य सहाय्यक प्रशांत फुगे, आशा सेविका श्रीम हिरताई बारणे, श्रीम मदिना शेख,सौ. शोभा बारणे श्रीम.जागृती संजय भागवत.श्रीम.रेश्मा अशोक कडाळे, श्रीम.मुस्कान जाकिर मोमीन लॅब टेक्निशियन निर्माण पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट राजगुरुनगर ,केंद्रप्रमुख पाटील सर; मुख्याध्यापक आंबेकर सर; पोखरकर सर, तिटकारे सर, तलाठी श्रीम.दिपिका बच्छाव सर्व शिक्षक स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Previous articleमाऊलींची पालखी हेलिकॉप्टरने नेण्याचा भाविकांचा प्रस्ताव
Next articleशिवशंभु छावा प्रतिष्ठानचे संस्थापक भरत पवळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योध्द्यांचा सन्मान