सहायक पोलीस निरीक्षक निलेश खेडकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सहायक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा अधिकारी या पदासाठी निवड

अतुल पवळे पुणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

काही लोक यश म्हणजे काय याच उत्तम उदाहरण असतात, याचे उदाहरण म्हणजे सध्या महाराष्ट्र पोलीस दलात असणारे सहायक पोलीस निरीक्षक निलेश खेडकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अंतिम यादीत स्थान प्राप्त करून, सहायक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा अधिकारी या पदावर नियुक्ती झालयाने राष्ट्रसेवा समूहाच्या वडगाव बु शाखेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

यावेळी अभिनंदन करताना शिवसेना खडकवासला विधानसभा मतदारसंघ प्रमुख नितीन अण्णा वाघ, राष्ट्रसेवा समूह वडगाव बु, अध्यक्ष स्वप्निल वाघ, रवी लोखंडे, सिद्धेश्वर मोरे सर संचालक नेस अकॅडमी पुणे, केतन हरिहर, धिरज मिसाळ, सिद्धार्थ पिसाळ, दिनेश निरंजन, सौरभ कुडले उपस्थित होते. तसेच सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या.

Previous articleतपासणी नाक्यावरील शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांना आठ तासाची ड्युटी द्या-गौतम कांबळे
Next articleकोरोना साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी आपल्या जीवनशैलीत बदल करावा- पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक