तरुणाला जबरदस्तीने गाडीत बसवून मारहाण

प्रमोद दांगट , निरगुडसर

पानमळा कोटमदरा (ता.आंबेगाव) येथील तरुणाला चार जणांनी आय 20 या चारचाकी गाडी मध्ये बसून डोंगरावर नेऊन मारहाण केल्याची घटना (दि. १२) रोजी घडली आहे. याबाबत अक्षय जयसिंग काळे ( वय वर्ष 26 रा.पानमळा कोटमदरा ता. आंबेगाव जि. पुणे ) यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की ,फिर्यादी काळे हे त्यांचे पानमळा कोटमदरा येथील हॉटेल भाग्यश्री हे सकाळी उघडण्यासाठी केले असता त्या ठिकाणी आय ट्वेन्टी ग्रे रंगाची गाडी घेऊन हॉटेल जवळ थांबली गाडीतून तीन व्यक्ती खाली उतरले व एक गाडीमध्ये बसून होता.खाली उतरलेल्या तीन व्यक्तींनी काळे यांना तू कुठला भाई आहे असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत गाडीमध्ये मधल्या सीटवर बसवले व गाडी भीमाशंकर ते मंचर रोड ने मंचर बाजूकडे घेऊन मोरडेवाडी कॅनॉल मार्गे अवसरी फाट्यावरून निरगुडसर गावचे अलीकडे असलेल्या डोंगरावर काळे यांना घेऊन त्या चार व्यक्तींनी गाडीतील बांबू काढून काळे यांना जबर मारहाण केली. त्यापैकी एकाचे नाव सागर जाधव (रा.निघोज ता. पारनेर जि.अहमदनगर ) असे असल्याचे त्यांच्या चर्चेतून काळे यांना समजले. त्यानंतर त्यांनी फिर्यादी काळे यांना पुन्हा गाडीत बसवून मुळेवाडी रोड वर सोडले व तू जर पोलिस तक्रार केली तर तुला जीवे मारून टाकू अशी धमकी दिली.

 काळे यांनी घडलेला प्रकार आपल्या वडिलांना फोन करून सांगितला व याबाबत त्यांनी घोडेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी सागर जाधव व इतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Previous articleजनावरांचा गोठा बांधण्यासाठी आणलेले लोखंडी अँगल अज्ञात चोरट्यांनी चोरले
Next articleहडसर गडावर गिर्यारोहकांनी अनुभवला खुंटीच्या वाटेचा थरार