जनावरांचा गोठा बांधण्यासाठी आणलेले लोखंडी अँगल अज्ञात चोरट्यांनी चोरले

प्रमोद दांगट, निरगुडसर

कोलदरा गोनवडी (ता.आंबेगाव) येथील शेतकरी निवृत्ती काळे यांनी जनावरांचा गोठा बांधण्यासाठी आणलेल्या ६ हजार रुपये किंमतीच्या पाच लोखंडी अँगल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ( दि. 11) रोजी रात्री घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, निवृत्ती लोखंडे यांनी आपल्या जनावरांच्या गोठा बांधण्यासाठी 6 हजार रुपये किंमतीचे पाच लोखंडी सी अँगल आणले होते. त्यांची पत्नी मंगल काळे दि. 11 रोजी रात्री जेवण उरकले नंतर बाहेर गेली असता तिला भिंतीच्या बाजूला असलेले अँगल दिसले नाही. त्यांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता ते सापडले नसल्याने कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे लोखंडी अँगल चोरून नेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत मंगल काळे यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Previous articleसुनेच्या त्रासाला कंटाळून सासूने गळफास घेऊन केली आत्महत्या
Next articleतरुणाला जबरदस्तीने गाडीत बसवून मारहाण