सुनेच्या त्रासाला कंटाळून सासूने गळफास घेऊन केली आत्महत्या

प्रमोद दांगट

सुनेच्या त्रासाला कंटाळून सासूने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना भिगवण (ता. इंदापूर) येथे घडली आहे. सुगंधा शिवाजी पवार (वय ५५, रा. साईनगर, भिगवण, ता. इंदापूर) असे आत्महत्या केलेल्या सासू महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी भिगवण पोलिसांनी मृत सुगंधा पवार यांची सून, तिची आई, मावशी यांच्यासह सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. स्वाती अतुल पवार (रा. भिगवण), मंगल पांडुरंग मासाळकर, संजना रामू धोत्रे (दोघीही रा. भिंगर, ता. पाथर्डी, जि. नगर), एक वाहनचालक व इतर तीन अनोळखी महिलांविरुद्ध शनिवार (दि.१०) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मृत महिलेचे पती शिवाजी काशिनाथ पवार यांनी तक्रार दिली आहे.

अधिक माहितीनुसार, स्वाती पवार हि तिची सासू सुनंदा यांना गेल्या पाच वर्षांपासून सतत घालून पाडून बोलणे, घाण शिव्या देण्याबरोबरच मारहाण करत त्रास देत होती. तू मरून का जात नाहीस, तुझ्यामुळे आम्हाला घरात राहणे कठीण झाले आहे. तू फास घेऊन मरून का जात नाही असे सतत बोलत होती .सुनेच्या या सततच्या त्रासाला कंटाळून सुनंदा यांनी बुधवारी (दि. ३०) जून रोजी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.

सुनंदा पवार यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यात आपण इज्जतदार महिला असून, सून सतत बाहेर माणसांमध्ये शिवीगाळ अपमानास्पद वागणूक देत होती. वगैरेचा मजकूर असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी सांगितले. जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Previous articleतरुणाच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरट्यानी पळवली
Next articleजनावरांचा गोठा बांधण्यासाठी आणलेले लोखंडी अँगल अज्ञात चोरट्यांनी चोरले