तरुणाच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरट्यानी पळवली

प्रमोद दांगट, निरगुडसर

मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एकलहरे गावच्या हद्दीतुन नारायणगाव येथे कामानिमित्त दुचाकीवर जाणाऱ्या तरुणाच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरल्याची घटना( दि. 11) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत वैभव सोपान थोरात ( वय, 28 राहणार, मधुबन पॅलेस सोसायटी मंचर ता. आंबेगाव पुणे )यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून दोन अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी वैभव थोरात हे नारायणगाव येथे कारपेट पाहण्यासाठी जात असताना दुपारी 2 वाजेच्या सुमारास पुणे नाशिक हायवे रोडवर एकलहरे गावच्या हद्दीत काळ्या रंगाचे जॅकेट ,टोपी ,हेल्मेट घालून काळ्या रंगाची पल्सर वर दोन अज्ञात इसमांनी येऊन फिर्यादी यांच्या गळ्यातील 25 ग्रॅम वजनाची 89,000 रुपयांची सोन्याची चैन खेचून चोरून नेली आहे. याबाबत घटनेची माहिती कळताच घटनास्थळी खेड उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंभाते मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी पाहणी केली सदर घटनेचा पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस सब इन्स्पेक्टर अर्जुन शिंदे करत आहे.

दरम्यान आंबेगाव तालुक्यात या अगोदर पिंपळगाव फाटा,अवसरी फाटा ,जारकरवाडी या ठिकाणीही दुचाकी चोरांना लुटण्याच्या घटना घडल्या असून याबाबत पोलिसांना अद्यापही तपास लावता आला नाही. तसेच काही दिवसापूर्वी एकलहरे येथे एका ट्रक चालकाला लुटण्याची घटना घडली होती. त्यानंतर ही दुसरी घटना घडली असून पोलिस प्रशासनाणे दुचाकी चालकांना लुटणाऱ्या या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहे.

Previous articleभारत फोर्ज कडुन प्राथमिक आरोग्य केंद्रांना कोविड- १९ च्या नियंत्रणासाठी मदत
Next articleसुनेच्या त्रासाला कंटाळून सासूने गळफास घेऊन केली आत्महत्या