तपासणी नाक्यावरील शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांना आठ तासाची ड्युटी द्या-गौतम कांबळे

दिनेश पवार-दौंड (प्रतिनिधी)

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात राज्यसरकारचे कर्मचारी वेगवेगळ्या प्रकारे काम करत आहेत यामध्ये शिक्षक व आरोग्य कर्मचारी तपासणी नाक्यावर 12तास ड्युटी करत आहेत,ती आठ तासाची करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्टराईब कर्मचारी कल्याण शिक्षक महासंघाचे राज्य महासचिव मा.गौतम कांबळे यांनी सहकारमंत्री,सातारचे पालकमंत्री-मा.बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.

सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दि.15 जुलै 2020 पासून शिक्षक व आरोग्य कर्मचारी यांना तपासणी नाक्यावर 12 तासाची ड्युटी दिली आहे, ती अन्यायकारक आहे,कामगार कल्याण कायद्याप्रमाणे 8 तासांची ड्युटी द्यावी अशी मागणी मा.गौतम कांबळे यांनी केली आहे

Previous articleखडकवासला ग्रामीण भागातील कुडजे व मांडवी बुद्रूक गावात कोरोनाचा शिरकाव ग्रामीण भागातील चिंता वाढली
Next articleसहायक पोलीस निरीक्षक निलेश खेडकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सहायक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा अधिकारी या पदासाठी निवड