भारत फोर्ज कडुन प्राथमिक आरोग्य केंद्रांना कोविड- १९ च्या नियंत्रणासाठी मदत

 प्रमोद दांगट, निरगुडसर

भारत फोर्ज लि पुणे व महाराष्ट्र आरोग्य मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम विकास कार्यक्रमांतर्गत कोविड १९ च्या पार्श्वभुमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपयुक्त असे साहित्य वाटप केले. त्यावेळी मा.श्री.लिना देशपांडे सीएसआर विभाग प्रमुख भारत फोर्ज लि,पुणे यांनी विचार व्यक्त करतांना कोवीड- १९ नियंत्रणात आणण्यासाठी एकत्रितपणे काम करू यासाठी सर्वप्रकारचे सहकार्य करण्यास भारत फोर्ज लि. तयार आहे. भारत फोर्ज कडुन दिल्या जाणाऱ्या मदतीचा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत वापर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

महाराष्ट्र आरोग्य मंडळ, डिंभा येथे बुधवार दि. ७ जुलै २०२१ रोजी वरील साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ,आंबेगाव पंचायत समिती सभापती संजय गवारी हे होते. महाराष्ट्र आरोग्य मंडळ संस्थेचे संचालक अरूण गुजर सोा.जि.प.सदस्या तुलसीताई भोर व रूपालीताई जगदाळे, पंचायत समिती आंबेगाव चे सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. लहामटे ,तालुका आरोग्य अधिकारी सुरेश ढेकळे इ. सन्मानीय व्यक्ती उपस्थित होते.

कोविड १९ च्या पार्श्वभुमीवर संस्थेच्या कार्यक्षेत्रातील डिंभे, तळेघर, अडिवरे व महाळुंगे पडवळ या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांना फ्रिज, ऑपरेशन थिअटर लॅम्प, मेडिसीन ट्राली, पेशंट बेड, लॅपटॉप, स्कॅनर प्रिंटर ,वाटर टँक, बीपी ऑपरेटर डिजिटल, वेईंग मशिन, सॅनिटायझर, फेसशिल्ड, आय गॉगल, पल्स ऑक्सिमिटर, थर्मामिटर, स्टिम इन्हेलर, इमरजन्सी मेडीसीन, थर्मल गण, ग्लुको मिटर, ब्लड ग्रुप किट, युरी स्ट्रिप एच बी किट स्ट्रिप्स, एच बी मॅन्युअल (सहालिज) मेडीसीन स्टोअरेंज कपाट,आंबु बॅग, नेबुलायझर मशिन व ऑक्सिजन कॉन्संट्रेटर इ. साहित्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी गाव विकास प्रकल्पाचे काम चालु असणाऱ्या गावांचे एकुण १२ सरपंच व चार प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सभापती संजय गवारी, तालुका आरोग्य अधिकारी श्री.ढेकळे जि.प. सदस्या तुलसीताई भोर व सौ रूपालीताई जगदाळे यांनी समयोचित मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित डॉक्टर व सरपंच यांनी प्रातनिधीक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती जनाबाई उगले, भारत फोर्ज सिएसआर विभागाचे जयदीप लाड, महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे अकौंट ऑफिसर सागर मिटकरी, कार्यकर्ते बाळासाहेब बेंढारी, माणिक सावंत, सोमा केंगले इ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक सुरेश काळे सोा.यांनी व आभार प्रदर्शन किशोर भोर यांनी केले. सुत्रसंचालन उदयसिंह चौधरी यांनी केले.

Previous articleदौंड येथे गावठी दारू ची वाहतूक करणाऱ्या मारुती स्विप्ट कार सह सुमारे चार लाखाचा माल जप्त : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई
Next articleतरुणाच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरट्यानी पळवली