दौंड येथे गावठी दारू ची वाहतूक करणाऱ्या मारुती स्विप्ट कार सह सुमारे चार लाखाचा माल जप्त : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई

अमोल भोसले,उरुळी कांचन
पुणे ग्रामीण जिल्हयात अवैध धंदयावर कारवाई करणेसाठी पोलीस अधीक्षक यांनी आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले गुन्हे शाखेचे पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोहवा. महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरू गायकवाड, पोना. अभिजित एकशिंगे, पोकॉ. दगडू विरकर यांचे पथक दिनांक १३/०७/२०२१ रोजी दौंड पोलीस स्टेशन हद्दीत  पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या बातमीनुसार पथकास मौजे दौंड, भिमनगर, शिरापूर रोड ता.दौंड जि.पुणे येथे इसम नामे बाळासाहेब अशोक दळवी वय ३७ वर्षे रा.मलटण ता.दौंड जि.पुणे हा त्याचे आर्थिक फायदयासाठी त्याचे ताब्यातील मारुती स्विप्ट कार नं. एमएच ४२ के ६५८८ चे डिकी मधुन बेकायदा बिगरपरवाना टायरचे २ ट्युबमधून गावठी हातभट्टी दारू कि.रु. ६,०००/-  स्विप्ट कार कार सह एकूण किं. ४,०६,०००/- (चार लाख सहा हजार) असा प्रोव्ही. माल वाहतुक करीत असताना मिळून आलेला आहे. सदर आरोपी व ताब्यात घेण्यात आलेला मुद्देमाल हा दौंड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेला आहे. आरोपी विरूध्द मुंबई प्रोव्ही. ॲक्ट कलम ६५(ई) प्रमाणे कारवाई केलेली आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख , बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सपोनि. सचिन काळे, पोहवा. महेश गायकवाड, पोहवा. निलेश कदम, पोहवा. सचिन गायकवाड, पोहवा. सुभाष राऊत, पोहवा. गुरु गायकवाड, पो.ना.अभिजित एकाशिंगे, पोकॉ. दगडू विरकर यांनी केलेली आहे.
Previous articleशिवसेना शाखेतून जनतेचे प्रश्न सोडवा-जिल्हाप्रमुख महेश पासलकर
Next articleभारत फोर्ज कडुन प्राथमिक आरोग्य केंद्रांना कोविड- १९ च्या नियंत्रणासाठी मदत