वेळ मिळेल तेवढा गरीबांच्या सेवेसाठी घालवणार- वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी

अमोल भोसले, उरूळी कांचन

कायद्याचा आदर करणा-यांना गुलाबाचे फूल व “कायद्याचे उल्लंघन करणा-यांना दांडक्याचा प्रसाद या विभागातील आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले यांचा आदर्श सर्वानी घेतला पाहिजे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिळेकर मळा येथे कु.नेहा नामदेव भोसले हिचा प्राथमिक शाळेत पहिलीला प्रवेश झाला. त्यामुळे शेवराई सेवाभावी संस्थेकडून एक नविन उपक्रम राबवण्यात आला. निसर्ग पुजा म्हणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोणी काळभोरचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते की मला आनंद वाटत आहे. उरुळी कांचन येथील बाएफ संस्था व निसर्ग उपचार केंद्रा विषयी मी लहानपणापासून ऐकुण होतो. तेथेच नोकरी करण्याची संधी मिळाली. आज कुमारी नेहा नामदेव भोसले हिच्या शालेय प्रवेशा निमित्त वृक्षारोपण करण्यात आले हे प्रेरणादायी आहे.

पोलीस खात्यात काम करत असताना. राहिलेल्या नोकरीत आपलाला जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ गरीबांची सेवा करायचे व आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले यांच्या संगे गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी मदत करुन त्यांना सन्मानित वागणूक मिळून देण्यासाठी प्रयत्न करत, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम करु. वृक्षारोपणाचा कार्यक्रम प्रेरणादायी आहे. सर्व पालकांनी याची नोंद घ्यावी असे आव्हान लोणी काळभोर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी केले.

या वेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, उरुळी कांचन पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले, मुख्याध्यापका लिना शहा, सर्व शिक्षक, रामचंद्र के. टिळेकर, जेष्ट साहित्यिक भास्कर भोसले, पोपटराव ताम्हाणे, किसन टिळेकर, राजेंद्र टिळेकर, ग्रामपंचायत सदस्य सुनिल तांबे ,पोलीस हवालदार जयश्री गायकवाड, आदर्श माता शेवराई भोसले, दिपक टिळेकर, सचिन भोसले, स्वप्रित भोसले,सेवदत चिल्ड्रन संस्थेचे सर्व सदस्य व शेवराई सेवाभावी संस्थेचे सदस्य उपस्थित होते.या सर्व कार्यक्रमाचे आभार सुनिल तांबे यांनी मानले तर, सूत्रसंचालन राजेंद्र (फरींदा)टिळेकर यांनी केले.

Previous articleपुरातत्व विभागाच्या तंत्रज्ञानाची खंडोबा मंदिराला भेट
Next articleवीज पडली अन् गंगा अवतरली