रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची मोजणी वरची भांबुरवाडी येथे सुरळीतपणे पूर्ण

राजगुरूनगर :पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची मोजणी वरची भांबुरवाडी (ता. खेड) येथे सुरळीतपणे पूर्ण झाली. या प्रकल्पाकरिता जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्यासाठी बैठक संपन्न झाली होती. त्या बैठकीस खेड उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी मार्गदर्शन केल्यानंतर ग्रामस्थांनी मोजणीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानुसार शुक्रवारी (दि. ९) मोजणी संपन्न झाली.

यावेळी महारेलचे भूसंपादन अधिकारी मंदार विचारे, मंडलाधिकारी सविता घुमटकर, तलाठी मनिषा राऊत यांच्यासह वेहेळदरा परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

खेडमध्ये रिंगरोडला जरी प्रथमदर्शनी विरोध होत असला तरी रेल्वेसाठी मोजणी सुरू झाल्याने रेल्वे भूसंपादन प्रक्रियेस गती आली आहे. आता शासन जमिनीचा दर किती जाहीर करणार याबाबत परिसरात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Previous articleदिव्यांग व्यक्तींना यूडीआयडी कार्डचे वाटप
Next articleपुरातत्व विभागाच्या तंत्रज्ञानाची खंडोबा मंदिराला भेट