दिव्यांग व्यक्तींना यूडीआयडी कार्डचे वाटप

राजगुरूनगर :दिव्यांग व्यक्तींना केंद्र शासनातर्फे दिले जाणारे यूडीआयडी कार्ड वाटप कार्यक्रम येथील पंचायत समिती कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य तथा समाजकल्याण समिती सदस्य बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत कोरोना महामारीचे सर्व नियमांचे पालन करून पार पडला.

यावेळी बोलताना काळे म्हणाले की केंद्र शासनातर्फे हे कार्ड यापुढे गटविकास अधिकारी यांचे मार्फत प्राप्त होणार आहे. भविष्यात दिव्यांगांच्या सर्व सोयी सुविधा या कार्डद्वारे मिळणार असल्याने जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमास गटविकास अधिकारी अजय जोशी यांच्यासह रमेश इष्टे, गणेश टिळेकर, विजय थिगळे, किशोर रोडे, अनिल डांगळे, जितू वाडेकर, दत्ता वाळुंज, गोरक्षनाथ सांडभोर, गणेश रोकडे आदी उपस्थित होते.

Previous articleमावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला उपाध्यक्षपदी छाया गोणते यांची निवड
Next articleरेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची मोजणी वरची भांबुरवाडी येथे सुरळीतपणे पूर्ण