जुन्नर तालुक्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या पोहचली ३१३ वर; आज २७ रुग्ण कोरोना बाधित झाल्याचे निष्पन्न

नारायणगाव  –  (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यामध्ये आज कोरोना बाधित रुग्णांची संख्या तब्बल २७ ने वाढली असून आजपर्यंत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल ३१३ एवढी झाली आहे. अशी माहिती गट विकास अधिकारी हेमंत गरीबे यांनी दिली.

आज जुन्नर येथे तब्बल सात रुग्ण, पारगाव तर्फे मढ येथे तीन रुग्ण, ओतूर, आळे – कोळवाडी, आगर – खोरे वस्ती, बारव, व वारूळवाडी या ठिकाणी प्रत्येकी दोन रुग्ण, काळवाडी, कुरण, डिंगोरे – गणपती फाटा, शिरोली बुद्रुक, हिवरे बुद्रुक, बादशहा तलाव, येडगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी उमेश गोडे व वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली.

 आजपर्यंत कोरोना मुळे तालुक्यातील एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण १३० रुग्णांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले आहे. तर सुमारे १७५ पेक्षा जास्त रुग्ण सध्या लेण्याद्री कोविड सेंटर व इतर हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत.

दरम्यान जुन्नर येथील आणखी एक नगरसेवक कोरोना बाधित असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

दिवसेंदिवस जुन्नर तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना सर्वच नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे व सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleदौंड तालुक्यात कोरोना चा उद्रेक शहरासह ग्रामीण भागात ही संख्या वाढली
Next articleखडकवासला ग्रामीण भागातील कुडजे व मांडवी बुद्रूक गावात कोरोनाचा शिरकाव ग्रामीण भागातील चिंता वाढली