पवनाधरण परिसरात पर्यटकांचा महापूर, वींकेंड बंदीचा उडाला पूर्ता फज्जा

पवनानगर- कोरोनाची दुसरी लाट ओसरली असुन महाराष्ट्र राज्याची कोरोनाच्या तिसऱ्या लाटेकडे वाटचाल सुरू झाली आहे त्यातच काल पुणे जिल्हाचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण पुणे जिल्ह्यात पर्यटकांसाठी कडक निर्बंध लागु केले असुन जेथे पर्यटक जास्त आढळतील त्यांच्यावर काडक कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण जिल्हाअधिक्षक व पिपंरी चिंचवड आयुक्तांना देण्यात आले आहेत पंरंतु पोलिस प्रशासनाकडुन त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आल्याचे चित्र लोणावळा व पवनानगर परिसरात पाहायला मिळत आहे.

लोणावळा परिसरात मोठ्या प्रमाणावर चोरून लपुन पर्यटक येत आहेत परंतु लोणावळा शहरात पोलिसांना जागोजागी नाकाबंदी केल्याने अनेक पर्यटकांनी आपला मोर्चा पवनानगर परिसराकडे वळविला त्यामुळे पवनानगर परिसरात सकाळपासुन मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळत होते त्यातच या परिसरातील रस्ते अरूंद व अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने तासं तास वाहतुक कोंडी पाहावयास मिळत होती.

या परिसरामध्ये पवना धरण,लोहगड किल्ला,तिकोणा किल्ला,वाघेश्वर मंदिर,दुधिवरे येथील प्रतिपंढरपुर पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात या परिसरात येत असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहावयास मिळत होती.

सध्या पावसाने ओढ दिल्याने अनेक नागरिकांना धबधब्याखाली भिजण्याची मज्जा घेता आली नाही त्यामुळे अनेक पर्यटक या परिसरात फेरफटका मारूनच परत माघारी फिरले तर काही पर्यटकांनी पवनाधरणावर सुरक्षारक्षक नसल्याने अनेक नागरिक मुक्तपणे पाण्यामध्ये उतरून पाण्याची मजा घेत होते त्यामुळे नागरिकांना कोरानाची भिती राहिली आहे का नाही असा प्रश्न निर्माण होतो. पाण्याचा कसलाही अंदाज न आल्याने अनेक पर्यटक पाण्यामध्ये बुडाल्याच्या घटना नवीन नाही आजच वाघेश्वर मंदिर परिसरामध्ये एक तरून बुडाला असल्याची माहिती येथील स्थानिक नागकरिकांना दिली आहे.

पवानगर येथे पोलिस स्टेशन नाही येथे पोलिस मदत केंद्र असल्याने येथे पोलि, कर्मचारी संख्या कमी असल्याने पोलिसांवर मोठा ताण निर्माण होतो परंतु पवनानगर परिसरात ये-जा करण्ाचे अनेक मार्ग आहे त्यामुळे पवनानगर येथे नावाला नाकाबंधी करून येणाऱ्या पर्यटकांकडुन फक्त पावती वसुलीचे काम केले जाते याबाबत कोणतेही पोलिस अधिकारी व कर्मचारी गांबीर्याने घेत नाही.जर खरे पर्यटन बंदी करायची असेल तर जोगोजागी नाकांबदी करून पर्यटकांना माघारी पाठवले तरच खऱ्या अर्थाने कोरानाला आपण नियत्रंणात आणु शकतो असे सुज्ञ नागरिक सांगत आहेत.

वाघेश्वर मंदिराचा परिसर हा वडगाव मावळ पोलिस स्टेशन अंतर्गत येत असल्याने त्यांचा कोणतेही पोलिस यंत्रणा याठिकाणी उपलब्ध नसल्याने पर्यटक बिनधास्त पाण्यात उतरतात व आपल्या जीवाला मुकतात.

Previous articleलोणीकंद-भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रघुनाथ तापकीर यांची बिनविरोध निवड
Next articleलायन्स क्लब ऑफ राजगुरुनगरच्या स्थापना दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान