आज आम्ही आंदोलन करायला नाहीतर प्रशासनाला इशारा देण्यासाठी आलोय

पवनानगर-धरणग्रस्तांच्या मागण्यांबाबत प्रशासनाकडून तारीख पे तारीख देऊन दिशाभूल केली जात असल्याने प्रशासनाला जाग आणण्यासाठी व शासनाला इशारा देण्यासाठीचे हे आंदोलन आहे. मागील दीड वर्षापूर्वी मी धरण ग्रास्तांचे प्रश्न मार्गी लावण्याचा व त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा शब्द दिला होता, तो शब्द पूर्ण करण्यासाठी मी मागील दीड वर्षात वारंवार जलसंपदा विभाग, भुमीअभिलेख, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे बैठका घेऊन वारंवार पाठपुरावा करत आहे.त्यांना पाहिजेल ती सर्व मदत करत आहे. मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून सर्व कामांची मजुरी मिळालेली असून देखील प्रशासकीय अधिकारी जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याने आज आम्ही जनआंदोलन करणार होतो, मात्र काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याचा व प्रलंबित विकास कामे वेळेत पूर्ण करण्याचा शब्द दिल्याने आज आंदोलन न करता प्रशासकिय अधिकाऱ्यांना इशारा देण्यासाठी आज या ठिकाणी आलो असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले. धरणग्रस्तांच्या मागण्यांसाठी आयोजित केलेल्या जनआंदोलनात ते बोलत होते.

यावेळी धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मुकुंद काऊर, धरणग्रस्त परिषदेचे अध्यक्ष रविकांत रसाळ, उपाध्यक्ष मारुती दळवी,राष्ट्रवादी कॉंग्रेस चे तालुका अध्यक्ष बबन भेगडे,सुवर्णा राऊत, रुपाली दाभाडे, जिल्हा नियीजन समिती सदस्य विठ्ठल शिंदे, ग्रामीण ब्लॉकअध्यक्ष सुभाष जाधव, राष्ट्रवादी पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले,महादेव कालेकर, आरपीआय चे तालुकाध्यक्ष नारायण भालेराव, सरपंच अजित चौधरी,तह्शीलदार मदुसुदन बर्गे,पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, कार्यकारी अभियंता विजय पाटील, उपविभागीय अभियंता अशोक शेटे,पोलीस उपअधीक्षक राजेंद्र कदम,नामदेव ठुले,बाळासाहेब मोहोळ, दत्तात्रय ठाकर, नारायण बोडके,किसन घरदाळे,संजय मोहोळ, दत्तोबा घरदाळे,बाळासाहेब काळे,आरती घारे,छाया गोणते,अनिल तुपे,रवी ठाकर,ज्ञानेश्वर निंबळे, पांडुरंग शिर्के उपस्थित होते

मावळ तालुक्यातील पवना व इंद्रायणी नद्यांवर कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे व त्यावरील पूल बांधणे आणि दुरुस्ती करणे, नद्यांवर घाट बांधणे, उपसासिंचन योजना राबविणे तसेच धरणग्रस्तांना जमिनींचे वाटप करण्याचे एका वर्षापूर्वीच उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांनी सूचना दिलेल्या असताना देखील अध्याप पर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने आमदार सुनिल शेळके यांनी प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करा, अथवा जनआंदोलन करून पवना नदीत सोडण्यात येणारे पाणी आडविण्यात येईल. असे पत्र जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता यांना २९ जुलै २०२१ रोजी दिले होते त्यानुसार आमदार शेळके हे शनिवारी (दि.१०) पवना धरणाजवळ आमदार सुनिल शेळके यांच्यासह सर्व धरणग्रस्त शेतकरी व स्थानिक नागरिक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी जमले होते.

यावेळी धरणग्रस्त कृतीसमितीचे अध्यक्ष मुकुंद काऊर व धरणग्रस्त परिषदेचे अध्यक्ष रविकांत रसाळ यांनी आमदार शेळके यांच्याकडे धरणग्रस्तांच्या मागणीचे पत्र दिले. त्यानंतर धरणग्रस्त प्रतिनिधींनी आपल्या मागण्या मांडल्या यावेळी सर्वांची मते विचारात घेऊन धरणग्रस्त शेतकऱ्याना जागा वाटप करणे, नद्यांवरील पुलांची कामे करणे, आढले -चाद्खेद या भागात उपसासिंचन प्रकल्प राबविणे इत्यादी कामास सुरवात करण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.तसेच अधिकाऱ्यांना धारेवर धरत सर्वांसमोर कामे कधी पूर्ण होतील याची कबुली देखील घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी देखील सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक जिल्हा अध्यक्ष सचिन घोटकुले यांनी धरणग्रस्तांच्या लढ्यासाठी वयक्तिक दोन लाख रुपयांची मदत देणार असल्याचे जाहीर केले. धरणग्रस्तांच्या मागण्यांचे हे जनआंदोलन शांततेत पार पडले.

Previous articleशेतक-यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे जिल्हा कृषी अधिक्षक ज्ञानेश्वर बोठे यांचे आवाहन
Next articleदौंडच्या लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांमध्ये भेदभाव कशासाठी ?