पाटस येथे १५ लाखाचा अवैध वाळूचा साठा जप्त; पुणे ग्रामीण LCB पथकाची कारवाई

अमोल भोसले, पुणे

पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे आदेशाने यवत पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्डवरील फरारी आरोपीचा शोध घेत असताना, स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास पाटस, खारतोडे मळा स्मशान भूमीजवळ येथे कोणीतरी अज्ञात इसमाने बेकायदेशीरपणे वाळूचा मोठ्या प्रमाणात साठा केला असलेबाबत बातमी मिळाले वरून त्याठिकाणी जाऊन खात्री केली असता मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा मिळून आला. त्याबाबत तहसीलदार यांना कळवून पाटस गाव कामगार तलाठी दिवेकर व दोन पंचांसमक्ष पंचनामा केला असता त्या ठिकाणी सुमारे बेकायदेशीर ३०० ब्रास वाळूचा साठा किं.रु. १५,००,०००/- (पंधरा लाख)  जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सपोनि. सचिन काळे, पोहवा. महेश गायकवाड, पोहवा. निलेश कदम, पोहवा. सचिन गायकवाड, पोहवा. सुभाष राऊत, पोना. गुरू गायकवाड, पोना. अभिजित एकशिंगे, पोकॉ. दगडू विरकर यांनी केलेली आहे.

Previous articleअन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या हवेली तालुका कार्यकारणीची पदनियुक्ती जाहीर
Next articleशेतक-यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे जिल्हा कृषी अधिक्षक ज्ञानेश्वर बोठे यांचे आवाहन