दौंड तालुक्यात कोरोना चा उद्रेक शहरासह ग्रामीण भागात ही संख्या वाढली

Ad 1

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

दौंड तालुक्यात सर्वत्र कोरोना रुग्णांची वाढ होत आहे,नागरीकांनी सावधानता पाळणे खुप गरजेचे बनले आहे, तालुक्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे तरी नागरिक ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे,आज दिनांक 21 जुलै रोजी दौंड शहरात 22 व ग्रामीण भागात 21 रुग्ण सापडले आहेत.

यामध्येग्रामीण भागात – केडगाव-आठ,बोरिभडक-(चंदनवाडी)-दोन,वरवंड-दोन,खुटबाव-एक,यवत-एक ,सहजपुर-4,कासुरर्डी-2,नांदूर-1 असे रुग्ण सापडले आहेत.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी दिली.यामध्ये सहजपुर, कासुरर्डी, नांदूर येथील रुग्णांचा खाजगी लॅब मधील रिपोर्ट आल्याचे सांगण्यात आले.दौंड शहरामध्ये देखील कोरोना ची दिवसभरात संख्या 22 झाल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी सांगितले

सर्व नागरिकांनी डॉक्टर, पोलीस,आरोग्य कर्मचारी, स्वच्छता दूत यांना सहकार्य केले, प्रशासनाने केलेल्या नियमांचे पालन करून,मास्क, सॅनिटायजर, सुरक्षित अंतर,आवश्यक असेल तरच बाहेर पडणे,घरी राहून सतर्कता बाळगल्यास कोरोना नक्कीच आटोक्यात येईल,
काही दिवसांनी सुरक्षित बाहेर पडायचे असेल तर आता घरी रहा,काळजी घ्या