अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या हवेली तालुका कार्यकारणीची पदनियुक्ती जाहीर

अमोल भोसले,कोरेगावमुळ

समाजातील कौंटुंबिक अन्याय अत्याचार तसेच युवती व महिला यांच्यावर होणारे अन्याय या गोष्टीला कायदा व सुव्यवस्था मार्गाने न्याय मिळवुन देण्याचे कार्य प्रदेशअध्यक्ष रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळात हवेली कार्यकारणीच्या माध्यमातुन केले जाईल. तसेच कार्यकारणीच्या मागे पुणे जिल्हा कार्यकारणी आणि महाराष्ट्र राज्य अन्याय अत्याचार निर्मुलन समिती खंबीरपणे साथ देण्यासाठी तयार राहील असे मत अन्याय अत्याचार निर्मुलन समिती पुणे जिल्हा महिला अध्यक्षा स्मिता दातीर यांनी आपले मनोगत पर मार्गदर्शन केले.

 कार्यक्रमास पुणे शहराध्यक्षा योगीता शिवरकर या कार्यक्रमास उपस्थित होत्या. हवेली तालुका अध्यक्ष प्रा.सुरेश वाळेकर यांनी हवेली कार्यकारणी सदस्यांना बरोबर घेऊन सामाजिक, शैक्षणिक, उद्योग व्यापार, शासकीय कार्यालय, अशा विविध क्षेत्रांत लोकांवर, समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार या गोष्टीला न्याय मिळवुन देण्यासाठी हवेली कार्यकारणी सदैव प्रयत्नशील राहील अशी सदिच्छा सुरेश वाळेकर यांनी मनोगतामध्ये व्यक्त केली.

सदर कार्यकारणीमध्ये हवेली तालुका महिला अध्यक्षा निलिमा गव्हाणे, मंगेश भुजबळ -सचिव, नरसिंग मानकरे-कार्याध्यक्ष, रविंद्र गायकवाड – सरचिटणीस, सिध्दार्थ शिंदे- कोषाध्यक्ष, सुजाता देवकर-महिला संघटक, अशोक कारंडे – सल्लागार, बाबासाहेब काटे- निमंञक, धनंजय रायकर- प्रवक्ता, ज्योती भालशंकर- महिला सहसंघटक अशा प्रकारे हवेली कार्यकारणीची पदनियुक्तीची निवड करुन नियुक्ती पञाचे वाटप स्मिता दातीर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सुरेश वाळेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सुजाता देवकर यांनी मानले.

Previous articleस्व.स्वप्नील लोणकर यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत करण्याची मागणी
Next articleपाटस येथे १५ लाखाचा अवैध वाळूचा साठा जप्त; पुणे ग्रामीण LCB पथकाची कारवाई