स्व.स्वप्नील लोणकर यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत करण्याची मागणी

दिनेश पवार,दौंड

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन दोन वर्षे झाले नियुक्ती झाली नाही यामुळे स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यांने नैराश्यातून आत्महत्या केली. त्यामुळे स्वप्नील लोणकर यांच्या कुटूंबियांना शासनाकडून वीस लाख रुपयांची आर्थिक मदत व त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला शासकीय नोकरी मिळावी यासाठी शिव जनसेवा युवा मंच दौंड शहर व तालुका यांच्या वतीने निवेदन दौंड तहसीलदार व पोलीस निरीक्षक दौंड यांना देण्यात आले.

या निवेदनावरती रुपेश राजू बंड,अप्पा काशीद,कुलदीप कांबळे,रवी बंड,दादा देशमुख,लखन पाचपुते,निखिल बंड,सागर मधुरकर,ऋषिकेश वागजकर,स्वप्नील शिंदे यांच्या सह्या आहेत

Previous articleवैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती ताटे यांचा सन्मान
Next articleअन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या हवेली तालुका कार्यकारणीची पदनियुक्ती जाहीर