पुरंदरच्या अंजिराला जगभरात किंमत : अंजिराला भौगोलिक मानांकन

अमोल भोसले,उरुळी कांचन

पुरंदर तालुका तसा दुष्काळी तालुका, परंतु अलीकडील काळामध्ये पुरंदरेने कृषिक्षेत्रात उंच भरारी मारली आहे. आधुनिक पद्धतीने शेतीचे अवगत केलेले तंत्रज्ञान, त्याचबरोबर जागतिक बाजारपेठेत निर्माण केलेले वलय यामुळे पुरंदरची शेती त्याचबरोबर शेतमाल हा भारताबरोबरच जगभरात नावाजला जातो. पुरंदर मध्ये सीताफळ, डाळिंब, अंजीर, पेरू, जांभूळ, आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी त्याच बरोबर इतर भाजीपाला पिकाचे उत्पन्न घेतले जाते. पुरंदरच्या अर्थकारणात अंजीर पिकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुरंदरच्या काही भागात अंजीर प्रामुख्याने घेतले जाते. त्यामध्ये दिवे, सोनोरी,पिंपळे, गुरोळी, सिंगापूर, वाघापूर, वडाचीवाडी आणि हवेली तालुक्यातील शिंदेवाडी, वेळू तसेच दौंड तालुक्यातील खोर या गावात अंजिराचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.


अंजीर पिकाला प्रामुख्याने ऐतिहासिक वारसा लाभला आहे .इतिहासात सुमारे 150 ते 200 वर्षांपासून घेतले जाणारे पीक म्हणून मंदिराची ओळख आहे. मुघलांनी किल्ल्याच्या आसपास अंजीर पिकांची लागवड केली असा ऐतिहासिक उल्लेख आढळतो. त्यामुळे इतिहासापासून महत्त्वाचे पीक म्हणून अंजीर पिकाकडे पाहिले जाते. पुरंदरच्या अंजिराला अधिक चांगली गोडी, टिकाऊपणा, चव आणि आठ ते अकरा दिवस कीपिंग कॉलिटी असल्यामुळे अंजीर प्रसिद्ध आहे. परदेशी युरोप बाजारपेठ काम काबीज करण्याचा उद्देश स्थानिक शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. उत्पादन वाढीबरोबर प्रक्रिया उद्योग त्याचबरोबर तसेच गुणवत्ता वाढवण्यासाठी विशेष लक्ष शेतकऱ्यांकडून दिले जाते. त्यामध्ये वेगवेगळ्या ग्रेड नुसार प्रतवारी करणे आणि सुधारित पॅकिंग चा वापर करून नवीन पॅकिंग तंत्र अवगत करून बाजारपेठेत चांगल्या आणि गुणवत्तापूर्ण दर्जाचा पाठवण्याचा हेतू शेतकऱ्यांचा आहे.


पुरंदरच्या 49 गावात अंजिराचे उत्पादन घेतले जाते. प्रती एकर साधारणता 400 रोपांची लागवड केली जाते.फुले राजेवाडी या वाणाची बहुतांशी लागवड तालुक्यात होते. उत्पादनाचा कालावधी ऑक्टोंबर ते जून दरम्यान असतो साधारणतः पाच महिने एक अंजिराचे झाड उत्पन्न देते. बहारा मध्ये प्रामुख्याने खट्टा व मीठ बहार पकडला जातो त्यामुळे बाजारपेठेत अंजीर बारमाही मिळू शकते.

2016-17 मध्ये GI INDEX( भौगोलिक मानांकन):-

महाराष्ट्र मधील जवळपास 10 पिकांना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. स्थानिक पिकाची गुणवत्ता ही माती, पाणी आणि हवामान यांच्यामुळे एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण व्हावी या हेतूने जीआय इंडेक्स दिला जातो. जागतिक बाजारपेठेत पिकाला वेगळी ओळख आणि विशेष बाजार भाव मिळण्यासाठी पिकाला मानांकन दिले जाते. 2016-17 मध्ये अंजीर पिकाला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी त्याचबरोबर केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि महाराष्ट्र राज्य अंजीर उत्पादक संघ यांच्याकडून विशेष प्रयतनाद्वारे मानांकन मिळविण्यात आले.

फळबाग लागवड घोषवारा

फळ क्षेत्र (हे)

सिताफळ 1737.84

डाळींब 1460

अंजीर 463.18

पेरू 308.50

अंजीर पिकाचे अर्थशास्त्र (एकरी)

अंदाजित खर्च- 99850 रुपये

अंदाजीत उत्पन्न -160 क्विंटल

सरासरी दर- 25रुपये

एकुण उत्पन्न- 4 लक्ष रुपये

निव्वळ नफा- 3लक्ष 150रुपये

खर्च नफा गुणोत्तर-1:4:00

Previous articleसेझबाधित शेतकऱ्यांना मिळणार पंधरा टक्के परतावा
Next articleपुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक लसीकरण केल्याबद्दल डॉ वर्षा गुंजाळ यांचा सन्मान