स्वाभिमानी संघटनेचे दूध दरवाढीसाठी आंदोलन

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

देशात कोरोना चा प्रादुर्भाव वाढलेला असताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, यात शेतीमालाला पुरेसा भाव मिळत नाही यातच दुधाचे दरही दिवसेंदिवस कमी होत आहे, शेतीबरोबरच शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावणारा व्यवसाय म्हणजे दूध व्यवसाय होय यासाठी शेतकऱ्याना प्रतिलिटर 10 रुपये तरी अनुदान ध्यावे,दूध पावडरच्या आयातीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे यावर उपाय योजना करावी आशा मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मा.खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या आंदोलनाला देऊळगाव राजे येथे दूध उत्पादकानीं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांना दूध उत्पादकानीं दुधाची अंघोळ घालून हे आंदोलन केले.

यावेळीमा.अभिमन्यू गिरमकर, मा.जनार्दन आवचर,मा.सतीश आवचर,मा.गणेश माने,मा.चेतन औताडे,मा.जालिंदर सूर्यवंशी,मा.सतीश कोल्हे, मा.बाबू घाडगे,मा.राजेंद्र गिरमकर, मा.अर्जुन सूर्यवंशी यांच्यासह पूर्वभागातील शेतकरी उपस्थित होतेE

Previous articleश्री.संत सावतामाळी महाराजांची पुण्यतिथी नदीकिनारी वृक्षारोपण करुन साजरी
Next articleदौंड तालुक्यात कोरोना चा उद्रेक शहरासह ग्रामीण भागात ही संख्या वाढली