श्रीमंत प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

अमोल भोसले,उरुळी कांचन

कोरोना संकटामुळे देशात भासत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन धनकवडी भागातील श्रीमंत प्रतिष्ठान यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
आधार ब्लड बॅक रक्तपेढीचे सहकार्य लाभले.यावेळी
पन्नास रक्तदात्यांंनी सहभाग नोंदवला.


यावेळी धनकवडी भागातील सर्वपक्षीय राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, पोलीस अधिकारी, आध्यात्मिक गुरू उपस्थित होते.


धनकवडी,भारती विद्यापीठ, कात्रज भागातील तरुणांचा व नागरिकांचा शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे समीर आमले यांनी सांगितले.

Previous articleनायगाव येथे लसीकरणाचा दुसरा डोस
Next articleज्योतिष शास्त्रातील दानशूर मान्यवरांच्या हस्ते सुरेखा ताईंचा वाढदिवसानिमित्त सत्कार