नायगाव येथे लसीकरणाचा दुसरा डोस

अमोल भोसले,उरुळी कांचन

प्राथमिक आरोग्य केंद्र कुंजीरवाडी अंतर्गत उपकेंद्र नायगाव व ग्रामपंचायत नायगावच्या वतीने कोविड -१९ दुसर्‍या डोसचे लसीकरण नियोजनबद्ध व शांततेत पार पडले. ग्रामपंचायत नायगावच्या वतीने लसीकरणसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा जिल्हा परिषद शाळा नायगाव येथे नायगाव पंचायतीच्या वतीने करण्यात आले होते.


सरपंच गणेश चौधरी, उपसरपंच पल्लवी गायकवाड , ग्रामसेवक स्वाती राजगुरू यांनी डॉ मेहबूब लाकडे, डॉ सुखदा कदम यांचे मार्गदर्शन नुसार नियोजित डोसचा पास सकाळी ८.०० वाजता निकषात असलेल्या व्यक्तींना दिल्याने कोविड नियमांचे पालन करून सर्व प्रकारच्या सुविधा लसीकरण वेळी केल्यामुळे ९० लोकांना कमी वेळात लसीकरण करणे शक्य झाले.


यावेळी माजी प्रभारी सरपंच राजेंद्र चौधरी, सदस्य कल्याणी हगवणे , दत्तात्रय बारवकर, जितेंद्र चौधरी, उत्तम शेलार, अश्विनी चौधरी, संगिता शेलार, बाळासाहेब गायकवाड , संजय पवार सर, दत्तात्रय चौधरी, संतोष हगवणे, रामचंद पवार, सुभाष चौधरी, योगेश चौधरी, नवनाथ गायकवाड, विजय चौधरी, शैलेश चौधरी, संजय चौधरी, सर्व आशा वर्कर्स, ग्रा.प कर्मचारी इ. उपस्थित होते.

Previous articleदावडी गावात ग्रामपंचायतीच्या वतीने विकास कामांना चालना
Next articleश्रीमंत प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद