दावडी गावात ग्रामपंचायतीच्या वतीने विकास कामांना चालना

राजगुरूनगर-खेड तालुक्यातील पूर्व भागातील मोठी ग्रामपंचायत म्हणून दावडी गावाची ओळख आहे.आदर्श ग्रामपंचायत दावडीच्या वतीने भव्य असा विकास कामांचे भूमिपूजन समारंभ पार पाडला.

दावडी गावातील अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण होण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने पाठपुरावा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मलाताई पानसरे यांनी गावठाण काँक्रीटीकरणसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे तसेच ग्रामपंचायतीच्या 15 वित्त आयोगातून दावडी गावात दर मंगळवारी आठवडे बाजार असतो पण लोकांची गैरसोय पावसाळ्यात होत असून याची दखल घेऊन त्या ठिकाणी 4 लाख रुपयेचा निधी उपलब्ध करून दिला. गावठाण व नवीन गावठाण या ठिकाणी R o-प्लँट बसविण्यात येणार आहे.जन सामान्य जनतेला अल्प दरात शुद्ध पाणी भेटणार आहे. यासाठी ग्रामपंचायत दावडी ने पुढाकार घेतला आहे.या विकास कामांच्या भूमिपूजनाच्या वेळी युवा नेते रोहनभैय्या मोहिते पाटी ,व उद्योजक सचिनशेठ नवले शुभहस्ते , सरपंच संभाजीआबा घारे यांच्या हस्ते करण्यात आला


यावेळी उपसरपंच राहुल कदम,पोलीस पाटील आत्माराम डुंबरे पाटील,मा उपसरपंच भाऊसो होरे,मा सरपंच सुरेशआप्पा डुंबरे पाटील,मा उपसरपंच हिरामण खेसे,उद्योजक मारुती बोत्रे,चेअरमन साहेबराव दुडे,ग्रामपंचायत सदस्य संतोष सातपुते, अनिल नेटके, मा उपसरपंच ऋषिकेश बेल्हेकर, राहुल सातपुते,युवा नेते संभाजी बढे सर,आनंदराव शिंदे,बबनराव शिंदे,ग्रामपंचायतीच्या सदस्या राणी डुंबरे पाटील, माधुरी खेसे,पुष्पा होरे,धनश्री कान्हूरकर,मेघना ववले, संगीता मैद,प्रियंका गव्हाणे, महिला दक्षता कमिटीच्या सदस्या रुपाली गव्हाणे, मा पोलीस पाटील तुकाराम गाडगे,मा ग्रामपंचायत सदस्य किसन दिघे,विठल गावडे,प्रकाश शिंदे, अंकुशराव दिघे,रामदास बोत्रे,राहुलशेठा सातपुते राजेश कान्हुरकर ळासाहेब वाघीरे, अल्ताब इनामदार,युवा नेते राजेश कान्हूरकर,सुनील गव्हाणे,नामदेव गव्हाणे, बाळासाहेब डुंडे सर,उपस्थित होते.

Previous articleनारायणगाव येथे नामवंत कंपनीचा लोगो वापरून बनावट आटा चक्क्या विकणाऱ्या दुकानावर पोलिसांचा छापा
Next articleनायगाव येथे लसीकरणाचा दुसरा डोस