शिरुर – हवेलीचे कार्यक्षम आमदार अशोक पवार यांची सरपंच विठ्ठल शितोळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

अमोल भोसले,उरुळी कांचन

जुनी जाणती माणसे कुटुंबातील खरं वैभव असतात कारण त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांनी अपार कष्ट घेतलेले असते. कोरेगावमुळ (ता.हवेली) गावाशी एक वेगळे ऋणानुबंध आहे शाळेच्या दोन वर्गमित्राच्या माध्यमातून पूर्वीचे गाव व आता वाढते नागरीकरण खूप बदल झाला असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले. तसेच खूप जुन्या आठवणींना उजाळा दिला.


सरपंच विठ्ठल शितोळे यांच्या वडीलांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने कौटुंबिक सदिच्छा भेट घेण्यासाठी आमदार अशोक पवार दैनंदिन कामातून वेळ काढून सरपंच विठ्ठल शितोळे देशमुख यांच्या निवासस्थानी उपस्थित राहिले होते.

 माजी उपसरपंच धैर्यसिंग शितोळे, माजी सरपंच सदाशिव कोलते, उद्योजक शांतराम चौधरी, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष आप्पा कड, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय काकडे, माजी चेअरमन अमित सावंत, कृषीनिष्ठ शरद शितोळे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक आप्पासाहेब काळभोर, पंचायत समितीचे सदस्य सनी काळभोर, एलाईट गुप्रचे आकाश छाजेड, माजी अध्यक्ष युवक अर्जुन कांचन, मानसिंग शितोळे, प्रविण शितोळे, चंद्रशेखर शितोळे, गणेश शितोळे , रमेश मेमाणे, प्रसाद शितोळे, गणपत गायकवाड आदी उपस्थित होते.

Previous articleमहाडिक फार्म महाडिक अँग्रो टुरिझमचे उद्घाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते संपन्न
Next articleनारायणगाव येथे नामवंत कंपनीचा लोगो वापरून बनावट आटा चक्क्या विकणाऱ्या दुकानावर पोलिसांचा छापा