महाडिक फार्म महाडिक अँग्रो टुरिझमचे उद्घाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते संपन्न

वाढदिवसाच्या जाहिरात

अमोल भोसले,उरुळी कांचन

आजच्या तरुणांनी राजकारणाच्या तसेच नोकरीच्या मागे पळण्यापेक्षा उद्योग व्यवसाय मध्ये खरंतर प्रगती केली पाहिजे असे मत रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले. शिंदवणे (ता.हवेली) याठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या महाडिक फार्म महाडिक अँग्रो टुरिझमचे उदघाटन शिरुर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अशोक पवार पवार बोलत होते.

यावेळी जालिंदर सदाशिव महाडिक पाटील, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष जगदीश महाडिक पाटील, महाडिक हायटेक नर्सरीचे सचिन महाडिक पाटील यांनी आलेल्या मान्यवरांच्या स्वागत केले.याप्रसंगी माजी सरपंच आण्णा महाडिक, पोलीस पाटील पोपट महाडिक, माजी सरपंच पंडित महाडिक, शिवाजी महाडिक, मारुती महाडिक पाटील, अर्जुन कांचन, विकास कटके सह अनेक गावातील आजी – माजी पदाधिकारी तसेच मित्रपरिवार उपस्थित होते.


कौटुंबिक कार्यक्रम विवाह, साखरपूडा, वाढदिवस याठिकाणी साजरे करण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध आहे स्पर्धेच्या युगात नवनवीन सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील असे महाडिक फार्म महाडिक अँग्रो टुरिझमचे मालक जगदीश महाडिक यांनी सांगितले.

Previous articleवडगाव कांदळी येथील कुकडी नदी पात्रात अनोळखी महिलेचा मृतदेह
Next articleशिरुर – हवेलीचे कार्यक्षम आमदार अशोक पवार यांची सरपंच विठ्ठल शितोळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट