गोमांस वाहतूक व विक्री च्या निषेधार्थ बजरंग दलाच्या वतीने नारायणगाव पोलिसांना निवेदन

नारायणगाव (किरण वाजगे)

सातत्याने होणार्‍या गोवंश – गोमांस वाहतूक व विक्रीच्या निषेधार्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल, जुन्नर प्रखंड यांच्यावतीने नारायणगाव पोलिसांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
प्राणी संरक्षण अधिनियम, गोहत्या बंदी कायद्याचे उल्लंघन होत असताना कसाई व दलाल यांना कायद्याचे भय राहिलेले नाही. यामुळे नुकतेच भोसरी,पुणे येथे गाभण गोमातेची विटंबना व हत्या केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. या घटनेचा तीव्र निषेध करत कडक कारवाई करावी. तसेच प्राणी संरक्षण अधिनियम गोहत्या बंदी कायद्याचे नियमन व्हावे यासाठी नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांना महंत विकासानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

सोमवार (दि. ५ ) रोजी नारायणगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक विशाल बाणखेले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नारायणगाव उपखंड प्रमुख किरण काळभोर, बाल विभाग प्रमुख फौजी उमेश अवचट, राजन वऱ्हाडी, अक्षय कसबे, संकेत खैरे, नयन खैरे, विकी वाजगे, किरण वारुळे, अक्षय गाडेकर, दर्पण पवार, सोन्या सरोदे, अभी रेवगडे, प्रशांत बेलवटे, अनिकेत गावडे, योगेश भिडे, ऋषिकेश बोरा आदी बजरंग दलाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी अशा आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. तसेच यापुढे असा प्रकार करणाऱ्यांवर कार्यवाही सुरू राहील असे आश्वासन दिले.

Previous articleभंगार दुकानदारांमध्ये तुफान हाणामारी
Next articleवडगाव कांदळी येथील कुकडी नदी पात्रात अनोळखी महिलेचा मृतदेह