भंगार दुकानदारांमध्ये तुफान हाणामारी

नारायणगाव :- (किरण वाजगे)

फेरीवाल्यांनी विक्रीसाठी आणलेले भंगार घेण्यावरून दोन भंगार दुकांदारामध्ये झालेल्या भांडणात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत दांडके, पाईप,कोयता लाथाबुक्क्यांनी मारहाण होऊन दुखापत झाली आहे. या प्रकारात दोन्ही दुकानदारांनी एकमेकाविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आल्याची माहिती नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

यामध्ये रोहित उर्फ रोहिदास रायभान नांगरे वय ३२ वर्ष धंदा स्टील विक्री रा कोल्हेमळा तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांनी सलमान अब्दुल रहमान मलिक, राहणार पाटे खैरे मळा नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे,साहिल रफिक मुलानी, (राहणार पाटे खैरे मळा नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे) , गुरमीत बलवीर सिंह ,(राहणार कोल्हेमळा नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे) ,पप्पू कांचन गौतम (राहणार मुक्ताईनगर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणेे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

तर साहिल रफिक मुलानी याने रोहिदास रायभान नांगरे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. यामध्ये नांगरे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,दि ४ जुलै रोजी ८.३५ वाजताच्या सुमारास नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे गावचे हद्दीत कोल्हेमळा येथील अन्वर किराणा स्टोअर चे पाठीमागे सलमान अब्दुल रहमान मलिक, साहिल रफिक मुलानी ,गुरमीत बलवीर सिंह , पप्पू कांचन गौतम यांनी फिर्यादिस येथे येऊन तुला लई माज आला आहे का तू आमचे पेक्षा जास्त पैसे देऊन स्क्रॅप मटेरियल सकाळी खरेदी करतो त्यामुळे आम्हाला माल भेटत नाही म्हणून आमचे धंद्याचे वाटोळे झाले आहे. त्यामुळे तुला आम्ही एकदाच खल्लास करतो. असे म्हणून साहिल रफिक मुलानी याने त्याच्या हातातील लोखंडी कोयत्याने नांगरे यांच्या डोक्यात व डाव्या डोळ्याजवळ कोयता मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला व इतरांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने उजव्या हातावर व व उजव्या बाजूस, तोंडावर पाठीवर व डाव्या बाजूचे तोंडावर मारहाण करून जखमी केले तसेच सदर वाहनांमध्ये माझी पाच तोळ्याची सोन्याची चैन ही झटापटी मध्ये कोठेतरी पडून गहाळ झाली आहे अशी तक्रार दिली आहे .
दरम्यान रोहित उर्फ रोहिदास नांगरे याने फिर्यादी साहिल मुलाणी यांचे मित्र गौतम याचे फोन वर फोन करून गुरमित सिंग , सलमान मलिक, गौतम आणि मला अन्वर चे दुकानाचे पाठीमागे बोलावून घेऊन शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देऊन लोखंडी पाईपने डावे बरगडीवर तसेच डावे हाताचे मनगटावर मारहाण करून तू तुझे फेरीवाले कसे फिरवतो ते बघतोच तुम्ही पोट भरायला आले आहेत. पोटच भरा असे म्हणून दुखापत केली आहे. या दोन्ही दोन्ही दुकानदारांच्या एकमेकांविरुद्धच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस करीत आहेत.

दरम्यान या घटनेमधील फिर्यादी व आरोपी रोहित उर्फ रोहिदास नांगरे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू असून सलमान अब्दुल रहमान मलिक, साहिल रफिक मुलानी ,गुरमीत बलवीर सिंह , पप्पू कांचन गौतम या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या चारही जणांना मंगळवार दिनांक ६ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे

Previous article‘आदर्श संसदपटू’ पुरस्कार दौंड चे आमदार राहुल कुल यांना जाहीर
Next articleगोमांस वाहतूक व विक्री च्या निषेधार्थ बजरंग दलाच्या वतीने नारायणगाव पोलिसांना निवेदन