श्री.संत सावतामाळी महाराजांची पुण्यतिथी नदीकिनारी वृक्षारोपण करुन साजरी

पुणे-‘कर्म हाच देव’ असे मानणाऱ्या श्री.संत सावतामाळी महाराज यांची ७२५ वी पुण्यतिथी शेलारवाडी येथील इंद्रायणी नदी तीरावर ‘श्री.संत सावतामाळी तरुण मंडळाच्या’ वतीने वृक्षारोपण करुन साजरी करण्यात आली….दरवर्षी शेलारवाडी येथे पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो…परंतू यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करत हा सोहळा साधेपणाने साजरा करुन वृक्षारोपण करण्याची संकल्पना मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते श्री.योगेश माळी व श्री.किशोर माळी यांनी मांडली होती

सकाळी श्री.सावतामाळी महाराज यांच्या मंदिरात मुर्तीचा अभिषेक करण्यात आला…त्यानंतर नदीकिनारी खड्डे घेऊन तेथे पिंपळ,वड,जांभूळ,भेंडी,चाफा,
दुरांडा इ.वृक्षांचे रोपण करण्यात आले…झाडांना कुंपण व आळी करुन खत व पाणी घालण्यात आले…या कामात लहान मुलांनीही श्रम करुन आपला खारीचा वाटा उचलला…सर्व झाडांना वेळोवेळी पाणी व खत देऊन त्यांची निगा राखण्यात येईल,असे श्री.लक्ष्मण माळी व नंदकुमार माळी यांनी सांगितले…वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याने भविष्यातही विविध ठिकाणी मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात येईल,अशी हमी श्री.दत्तात्रय माळी, श्री.सुनिल माळी व संजय माळी यांनी दिली…मंडळाचा हा उपक्रम पाहून शेलारवाडी येथील ग्रामस्थांनीही उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला…

अमरदेवी मंदिर परिसर सफाई,जेष्ठ नागरिक तिर्थयात्रा,इंद्रायणी नदी परिसर स्वच्छता,सामाजिक संस्थांना मदत व वृक्षारोपण इ.विविध उपक्रम राबविणाऱ्या श्री.संत सावतामाळी मित्र मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे….

???????

Previous articleनॉनकोविड रुग्णांच्या उपचारांचा खर्च महात्मा फुले जन आरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत करण्याची खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची मागणी
Next articleस्वाभिमानी संघटनेचे दूध दरवाढीसाठी आंदोलन