‘आदर्श संसदपटू’ पुरस्कार दौंड चे आमदार राहुल कुल यांना जाहीर

सचिन आव्हाड

राष्ट्रकुल संसदीय मंडळाद्वारे सन २०१७-१८ चा ‘आदर्श संसदपटू’ पुरस्कार दौंड चे आमदार राहुल कुल यांना जाहीर झाला . या पुरस्कार वितरण सोहळ्याचे निमंत्रण कुल यांना दि ४ जुलै २०२१ रोजी मिळाले, हे पत्र पाहून आमदार राहुल कुल यांना आनंद झाला आणि नकळत डोळ्यांच्या कडा पाणावल्या , कारण ४ जुलै म्हणजे आमदार राहुल कुल यांचे वडील, दौंड तालुक्याचे लोकनेते, कर्मयोगी,आमदार कै. सुभाषआण्णांचा स्मृतिदिन..सुभाषअण्णांच्या स्मृतीदिनी जाहीर झालेल्या या पुरस्काराने आमदार राहुल कुल हे भावुक झाले .

४ जुलै २००१ रोजी कुल कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला, नियतीने डाव साधला आणि दौंड तालुक्याचे तत्कालीन आमदार कै. सुभाष आण्णा कुल अकाली सोडून गेले . त्यांच्या जाण्याने दौंड तालुका पोरका झाला. कुल कुटुंबीयांसमोर अनके यक्ष प्रश्न उभे होते ,अनेक संकटे आ वासून उभी होती. ध्यानी मनी नसताना असे अघटित घडले आणि मोठी जबाबदारी राहुल कुल यांच्या अंगावर येऊन पडली, कै. सुभाषआण्णांनी घेतलेलं जनसेवेचे व्रत, संघर्षांचं बाळकडु हा वारसा व प्रेरणा घेऊन समाजकारणाची वाटचाल कुल कुटूंबियांनी सुरु ठेवली.


२०१४ मध्ये दौंड तालुक्यातील जनतेने राहुल कुल यांना विधानसभेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली . त्याचवेळी या संधीच सोन करण्यासाठी जीवाचं रान करण्याचा संकल्प राहुल कुल यांनी केला होता . थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने, युवा सहकाऱ्यांच्या साथीने विकासकामांचा डोंगर उभा केला. संसदीय लोकशाहीची सर्व आयुधे वापरून दौंडचा आवाज विधानसभेमध्ये बुलंद केला, ८०० पेक्षा जास्त प्रश्न मांडले, शेकडो चर्चांमध्ये सहभाग घेतला, नेहमी सापत्नभाव मिळालेल्या दौंड तालुक्याचा स्वाभिमान, ओळख जपली.

समाजातील सर्व घटकांना केंद्रबिंदू मानून विकास आणि समाजहित साधत राजकारण या मूलमंत्रासह कै. सुभाषआण्णांच्या विचारांचा वारसा घेऊन, आपल्या सर्वांचे आशीर्वाद, प्रेम व विश्वासाच्या बळावर मी वाटचाल करत आहे, ‘आदर्श संसदपटू’ या पुरस्काराच्या रूपाने कै. सुभाष आण्णांना वाहिलेली हि एक आदरांजली आहे असे मी मानतो व ज्यांच्या मुळे मला हे काम करण्याची संधी मिळाली त्या सर्व मतदार बंधू भगिनींना मी हा पुरस्कार समर्पित करतो.. आपल्या सर्वांच्या स्वप्नातील ‘सुजलाम सुफलाम’ दौंड तालुका घडविणे हेच माझे ध्येयं असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले .

Previous articleदत्तात्रय नाईकडे गुरुजी यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार
Next articleभंगार दुकानदारांमध्ये तुफान हाणामारी