दत्तात्रय नाईकडे गुरुजी यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार

वाढदिवसाच्या जाहिरात

राजगुरूनगर-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुरसेवाडी केंद्र गुंडाळवाडी येथील शिक्षक दत्तात्रय नाईकडे गुरुजी यांचा आज बुरसेवाडी येथे सेवापूर्ती निमित्त गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दत्तात्रय नाईकडे गुरुजी यांनी ३३ वर्षें सेवा पूर्ण करून निवृत्त झाल्याबद्दल शाळा बुरसेवाडी येथे गुंडाळवाडी केंद्राच्या वतीने मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

दत्तात्रय नाईकडे गुरुजी यांनी आपल्या सेवेत शाळा ,प्रशासन , समाज या सर्व क्षेत्रात प्रामाणिक काम केल्याचे गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे सांगितले.

या सोबतच यावेळी सत्कारार्थी म्हणून दत्तात्रय नाईकडे गुरुजी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या,सोबतच विस्तार अधिकारी जीवन कोकणे साहेब ,केंद्रप्रमुख विजय सुरकुले ,मुख्याध्यापक हरिभाऊ पोटे ,सुरेश नाईकरे , शमा घोडके,मीरा मिंडे, वाघचौरे मॅडम,नाथा राऊत यांनी विचार मांडले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनाली तनपुरे, विषय तज्ञ दयानंद शिंदे सर,ज्ञानेश्वर आपाणे,मधुकर गिलबिले ,यांसह गुंडाळवाडी केंद्रातील शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते.


या कार्यक्रम संयोजन गुंडाळवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख विजय सुरकुले साहेब, बुरसेवाडी शाळा मुख्याध्यापक हरिभाऊ पोटे , सुवर्णा गोईलकर ,शमा घोडके यांनी केले.यासोबत नाथा राऊत ,रविकिरण कातोरे, धनाजी कोळी यांनी विशेष सहकार्य केले,
सूत्रसंचालन शमा घोडके व आभार नीलकंठ कोरडे यांनी व्यक्त केले.

Previous articleवारीच्या वाटेवरील गावांची निराशा
Next article‘आदर्श संसदपटू’ पुरस्कार दौंड चे आमदार राहुल कुल यांना जाहीर