ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी

घोडेगाव : – जिल्हा परिषद १०% कर्मचारी ग्रुपच्यावतीने आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. ग्रामपंचायतच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या सेवेत आलेल्या १० % कर्मचारी ग्रुपच्या कर्मचारी वर्गाच्या मिंटिग मध्ये तालुक्यातील ग्रामविकास आधिकारी ग्रामसेवक ,अरोग्य सेवक , आर्युवेदिक दवाखाना परिचर व इतर परिचर यांना शासन सेवेत १० % आरक्षण मिळाल्यानंतर ग्रामपंचायतची पुर्ण सेवा खंडीत झाल्याने त्यांना पेंन्शन लाभ घेता येत नाही. त्यामुळे जुनी पेंशन योजना मंजूर करावी अशी मागणी सभागृहात करण्यात आली.


कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शासन दरबारी मागण्या मान्य कराव्या यासाठी अध्यक्ष सचिव ,सल्लागार यांची नेमणूक करून ग्रुप कमिटी स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा कमिटीवर शिष्ट मंडळ नेमण्याचे देखिल ठरवण्यात आले आहे.

अध्यक्षपदी चास ग्रावचे ग्रामसेवक मा. श्री जयवंत मेंगडे , सचिवपदी मा. श्री कैलास केंद्रे व सल्लागार पदी मा. श्री शिवाजीराव कोकणे, संतोष तळेकर ,रियाज शेख यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे


या प्रसंगी रामदास निघोट , अशोक निघोट, सुरेश गवारी , गोरक्ष नाईक , अशोक शेवाळे, बाळु हुले, सोमा आंबवणे , विष्णू वरे, यादव साबळे , अरुण सोमवंशी , रुपेश मोरे आदि शासकीय कर्मचारी पदाधिकारी तसेच १० % जिल्हा परिषद ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थीत होते या वेळी सुत्रसंचालन ग्रामसेवक जयवंत मेंगडे , कैलास केंद्रे यांनी तर अभार रुपेश मोरे यांनी मानले.

तालुक्यातील सर्व कर्मचारी वर्गांना एकत्रित आणून योग्य पध्दतीने जागृत करुन अतिशय जोमाने , हसत खेळत , संघटीत करायचे काम कैलास केंद्रे यांनी केले. तसेच जिल्हा पातळीवरील ग्रुपला देखिल ते सक्रीय झाले आहे. लवकरच या बाबत मिंटिग देखिल लागणार आहे. हे सर्व घडवण्यासाठी त्यांना ग्रामसेवक जयवंत मेंगडे तसेच मोरे भाऊसाहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Previous articleराजेगांव मध्ये राजेश्चर ऑक्सीजन पार्क
Next articleजुन्या भांडणाच्या वादातून झालेल्या खूनाचा उलगडा