राजेगांव मध्ये राजेश्चर ऑक्सीजन पार्क

दिनेश पवार,दौंड

राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त राजेश्वर विद्यालय राजेगाव याठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे दौंड तालुुका अध्यक्ष रमेश शितोळे यांच्या नेतृत्वाखाली ऑक्सिजन पार्क (छोटे जंगल )तयार करण्यात आले .

चार गुंठ्याच्या ऑक्सीजन पार्क मध्ये वड , पिंपळ ,करंज ,काशीद , बहावा , वाव्हळ ,चिंच , हिरडा , काटेसावर , भेंडी , अँक्सिया ,अशा प्रकारची फळे , फुले येणारी , ऑक्सीजन देणारी , उंच उंच जाणारी , 500 झाडे लावण्यात आली . ऑक्सीजन पार्क झाडासाठी ठिंबक आणि काटेरी कुंपन करण्यात येणार आाहे.


यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नितीन गावडे पाटील , श्रींकात आटोळे ,प्रहार जनशक्ती पक्षाचे उपाध्यक्ष रफिक शेख , युवक अध्यक्ष राहुलजी दोरगे ,
कामगार आघाडीचे अध्यक्ष प्रमोद शितोळे ,शिवाजी भाऊ मोरे , मुख्याध्यापक सोमनाथ तांबे सर ,राजेंद्र कदम ,सुनिल जगताप ,गणेश वाघमारे ,सुरज ढमे ,भरत मोरे ,योगेश वाघमारे तसेच राजेश्वर विद्यालयाचे सर्व शिक्षक आणि सेवक बांधव उपस्थित होते .

Previous articleखासदार डॉ.अमोल कोल्हे तसेच आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नाने कोरेगावमुळला नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात आला-सरपंच विठ्ठल शितोळे
Next articleग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी