कारची मोटर सायकलला धडक पित्याचा जागीच मृत्यू ठार ; पाच वर्षाची मुलगी जखमी

नारायणगाव :- (किरण वाजगे)

नारायणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणार्‍या कांदळी येथील जांबुत फाटा ते नगदवाडी रोडवर भरधाव वेगाने येणाऱ्या मारुतीकारने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला धडक दिल्याने पिता जाग्यावर मृत्युमुखी पडला. तर बरोबर असणारी ५ वर्षाची मुलगी किरकोळ दुखापत होऊन बचावली.

धीरज तुकाराम घाडगे (वय ३२ वर्षे रा नगदवाडी कांदळी ता जुन्नर जि पुणे) असे या अपघातात मृत झालेल्या इसमाचे नाव असून तिथी धीरज घाडगे (वय ५ वर्षे) ही मुलगी किरकोळ जखमी झाली आहे

नारायणगाव पोलिसांनी ज्ञानदेव शंकर गुंजाळ (रा कांदळी ता जुन्नर, जि. पुणे) यावर बेजबाबदार पणे गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याबाबत तसेच अपघाताची खबर न देता पळून गेल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची फिर्याद नबाजी लक्ष्मण घाडगे वय ६३ रा नगद वाडी कांदळी ता.जुन्नर जि. पुणे यांनी दिली असून त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ३ जुलै रोजी सायं ७ वाजताचे सुमारास मौजे कांदळी गावच्या हद्दीत जांबुत फाटा ते नगद वाडी रोडवर मयत धीरज घाडगे हे त्यांचे ताब्यातील होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल नं एम एच १४ इ बी ८२७३ हिच्यावर त्याची मुलगी तिथी हिस घेऊन जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती कंपनीच्या वॅगन आर गाडी नं एम एच १४ ए एफ ३०९२ यावरील चालक ज्ञानदेव शंकर गुंजाळ रा सुतारठीके कांदळी याने त्याचे ताब्यातील कार हायगयीने भरधाव वेगात वाहतुकीच्या नियमा कडे दुर्लक्ष करून धीरज घाडगे यांच्या मोटारसायकल ला जोरदार धडक दिल्याने धीरज याच्या डोक्यास गंभीर जखम झाल्याने त्याचा मृत्यू झाला तर मुलगी तिथी हिस किरकोळ मार लागला या अपघाताची खबर न देता कार चालक पळून गेला यावरून पोलिसांनी कार चालका विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक भीमराव लोंढे करत आहे.

Previous articleचाकूचा धाक दाखवून प्रवाशांकडून पैसे लुबाडणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
Next articleमहिला वन अधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या बछड्याला सोडले निसर्गाच्या अधिवासात