वाघोली- पेट्रोल,डिझेल व खाद्य तेलाच्या दरवाढीच्या निषेधार्थ आमदार अॕड.अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे आंदोलन

अमोल भोसले,वाघोली

केंद्र सरकारच्या निष्क्रिय कारभारामूळे जनता त्रस्त झाली आहे. जनतेचा विचार न करता हे सरकार वागत आहे. याचा निषेध करण्यासाठी शिरूर हवेलीचे आमदार ॲड् अशोक पवार यांचे मार्गदर्शनाखाली हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वाघोली येथे आंदोलन करण्यात आले.

यावेळी पेट्रोल-डिझेल दरवाढ, खाद्य तेल दरवाढ, लसीचे राजकारण तसेच अन्य बाबींवर रोष व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर प्रतिकात्मक चूल पेटवत गॅस दरवाढीचा देखील तीव्र निषेध करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डाॅ.चंद्रकांत कोलते, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी सरपंच शिवदास उबाळे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस प्रदिप वसंतराव कंद, बाळासाहेब सातव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस हवेली तालुका अध्यक्ष योगेश शितोळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस हवेली तालुका अध्यक्षा लोचन शिवले, उपाध्यक्षा राष्ट्रवादी महिला काँग्रेस माधुरी वाळके, ह.ता.पं.स.सदस्या संजीवनी कापरे, शोभा हरगुडे, नम्रता कांबळे, माजी सरपंच आव्हाळवाडी संदेश आव्हाळे, मंगेश सातव, गणेश सातव, भाऊ वारघडे, रसिकांत आव्हाळे, माजी सरपंच तुळापुर गणेश पुजारी, विजय वाळुंज, नवनाथ वागसकर, पंडीत कोलते, योगेश थोरात, राहुल ठोंबरे, शाम खलसे, साईनाथ वाळके, संतोष मगर, काळुराम ठोंबरे, रुपेश हन्डगर, संजय शिंगारे, संतोष गावडे, बळीराम गावडे आदी उपस्थित होते.

Previous articleकासुडी॔ टोलनाका ते पंधरा नंबरपर्यंतच्या रस्त्यावरील  रस्त्याची दुरुस्ती लवकर न केल्यास आंदोलन करणार — सामाजिक कार्यकर्ता उमेश म्हेत्रे
Next articleचाकूचा धाक दाखवून प्रवाशांकडून पैसे लुबाडणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात