कासुडी॔ टोलनाका ते पंधरा नंबरपर्यंतच्या रस्त्यावरील  रस्त्याची दुरुस्ती लवकर न केल्यास आंदोलन करणार — सामाजिक कार्यकर्ता उमेश म्हेत्रे

अमोल भोसले,उरुळी कांचन

पुणे सोलापूर रोडवरील कासुडी॔ टोलनाका ते  कदमवाकवस्ती टोलनाक्यांपुढच्या पंधरा नंबरपर्यंतच्या रस्त्यावरील साईडपटयावर आणि संरक्षण कठडयाजवळ भरपूर प्रमाणात काट्या, माती, वाळू, खड्डे आणि संरक्षणासाठी लावलेले लोखंडी सळई पडलेल्या अवस्थेत आहेत. सध्या पावसाळा सुरु असल्याने साईडपटयावर वाळू – मातीचा थर बसल्याने थोडाजरी पाऊस पडल्यावर तसेच एक्स्प्रेस हायवेवर दक्षिण भारतात जाणारया ट्रक, एसटी, मोटार वाहन गाड्या आणि पुण्यात जाणारया ट्रक, एसटी, बस, मोटार एक्स्प्रेस हायवेवरील रस्त्यावर फास्ट गाड्या चालवतात. टु व्हीलर वाल्यांना साईडपटयावरुन गाड्या चालवाव्या लागतात व रस्ता ओलसर असल्याने टु व्हीलर गाड्या घसरतात आणि अपघात होऊन काही अपघातग्रस्त मरण पावले आहेत.

का
अपंगत्व प्राप्त झाले आहे तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे, काट्या, साइटच्या सळंई, वाळू – माती लवकरात लवकर उचलावी तसेच काही दुरुस्ती असेल ती करावी जेणेकरुन पुढे होणारे अपघात थांबतील. बोरीभडक फाट्यावर, इनामदार वस्तीजवळ, गुलमोहर कार्यालय जवळपास रस्त्यावरील साईडपटयावर भरपूर प्रमाणात पुण्यात- मुंबईत जाणारया गाड्यांमधील कचरा टाकला जातो. त्या गावातील ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी टाकणारयावर कडक निर्बंध घालून कचरयाची जेसीबीच्या साहाय्याने कचरा हलवणे गरजेचे आहे.
कारण आताच आपण कोरोना या रोगांच्या साथीतून सावरत आहे नाहीतर टाकलेल्या कचरयामुळे परिसरात वासामुळे दुर्गंधी, रोगराई, लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढू शकते तरीही प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून दोन्हीही कामे पूर्ण करावीत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पावसाळयापूर्वी रस्त्याच्या कडेला असणारी साफसफाई करुन घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे यांनी केली अन्यथा उपोषण केले जाईल असे सांगितले.
Previous articleमावळची सुवर्ण कन्या तृप्ती निंबळे यांच्या वाढदिवसांचा अनाठाई खर्च टाळून आदिवासी बांधवांना धान्याचे वाटप
Next articleवाघोली- पेट्रोल,डिझेल व खाद्य तेलाच्या दरवाढीच्या निषेधार्थ आमदार अॕड.अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे आंदोलन