दौंड तालुक्यात सर्वत्र कोरोना वाढतोय

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

दौंड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे,आज ता.20 जुलै रोजी एकाच दिवसात तालुक्यात यवत पासून वाटलूज पर्यंत कोरोना चे रुग्ण सापडले आहेत,यामध्ये कासुरर्डी येथे लग्नसोहळा मुळे 17 जण कोरोना पॉजटिव्ह ,बोरिभडक- चार,पाटस -तीन,केडगाव,सहजपुर,राजेगाव, वाटलूज याठिकाणी प्रत्येकी एक कोरोना पॉजिटिव्ह सापडले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी सांगितले.

कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, नागरिकांनी सावधानता बाळगली पाहिजे, काही दिवस गर्दी होणारे कार्यक्रम टाळणे,आवश्यक असेल तरच घराबाहेर पडणे, मास्क,सॅनिटायजर यांचा वापर करूनच बाहेर पडणे,स्वयंस्फूर्तीने सोशल डिस्टन्स पाळणे ही खबरदारी घेणे गरजेचे आहे, कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती होणे खूप गरजेचे आहे यासाठी ग्रामस्तरीय उपायोजना करणे गरजेचे आहे

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल नाईकवाडी यांच्या मातोश्रीचे निधन
Next articleनॉनकोविड रुग्णांच्या उपचारांचा खर्च महात्मा फुले जन आरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत करण्याची खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची मागणी