मावळची सुवर्ण कन्या तृप्ती निंबळे यांच्या वाढदिवसांचा अनाठाई खर्च टाळून आदिवासी बांधवांना धान्याचे वाटप

पवनानगर- वाढदिवसाचा अनाठाई खर्च टाळून मावळ ची सुवर्ण कन्या पैलवान थायबाँक्सिक गोल्ड मिडेल विजेती तृप्ती शामराव निंबळे मावळ व पिंपरी चिंचवड शहरामध्ये N 95 चे मास्क व गरजूंना धान्य वाटप करण्यात आले.

यावेळी वारु ब्राम्हणोली चे सरपंच शाहिदास शिंदे, महाराष्ट्र चाँपियन शामराव निंबळे,उपसरपंच पोपट शिंदे, शिवाजी शिंदे, भरत निंबळे,सदाशिव निंबळे,जिजाबाई निंबळे, निवृत्ती निंबळे, गंगाराम वाघमारे, श्रावण वाघमारे,यावेळी उपस्थितीत होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत निंबळे यांनी केले व प्रास्ताविक गणेश साठे सर यांनी केले तर आभार शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केले.

गेली दिड वर्षांमुळे अनेक वंचित कुटुंब कि ज्याचे हातावर पोट अशा आदिवासी व कातकरी बांधवांना धान्याचे किट वाटप व N 95 चे मास्क वाटप करण्यात आले भविष्यात हि वेगवेगळ्या पध्दतीने मदत करण्याचा माणस निंबळे यांनी व्यक्त केला.

Previous articleसंस्थाचालक शिक्षण मंडळाकडून शिक्षण आयुक्तांना मागण्यांचे निवेदन
Next articleकासुडी॔ टोलनाका ते पंधरा नंबरपर्यंतच्या रस्त्यावरील  रस्त्याची दुरुस्ती लवकर न केल्यास आंदोलन करणार — सामाजिक कार्यकर्ता उमेश म्हेत्रे