माजी सभापती सुजाता पवार यांच्या नेतृत्वाखाली खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांची आरोग्य तपासणी

वाढदिवसाच्या जाहिरात

अमोल भोसले, उरुळी कांचन

संसदमहारत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने रावलक्ष्मी ट्रस्ट आणि जहांगीर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे माजी सभापती सुजता पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.


आयोजित केलेल्या शिबिरामध्ये मांडवगण आणि परिसरातील सहाशे पेक्षा जास्त मुलांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. शिबिरात मुलांची उंची, वजन, हाडांची तपासणी व एच. बी. तपासणी तज्ञ बालरोग डॉक्टरांकडून करण्यात आली व योग्य आरोग्य मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आठरा वर्षा पुढील मुलींची कॅल्शियम टेस्ट करण्यात आली.


यावेळी रावलक्ष्मी ट्रस्ट मार्फत शिबिरात उपस्थित मुलांना खाऊ व आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. कोरोनाच्या या संकट काळात लहान मुलांच्या आरोग्याची काळजी करत शिबिराचे आयोजन केल्याबद्दल व सुरेख नियोजन केल्याबद्दल जहांगीर हॉस्पिटलच्या टीमने तसेच पालकांनी राव लक्ष्मी ट्रस्ट तसेच आमदार अॅड् अशोक पवार आणि माजी सभापती सुजाता पवार यांचे आभार मानले . या स्तुत्य उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

1

शिबिरासाठी मंगल कार्यालय उपलब्ध करून दिल्याबद्दल संभाजी फराटे व सहकार्याबद्दल ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
लहान मुलांच्या हस्ते केक कापून यावेळी सुजाता पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा उत्साहात वाढदिवस साजरा केला.

Previous articleखा.सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त जवळार्जून येथे मोफत नेत्र तपासणी
Next articleसरपंचाचे नारायणगावात रास्ता रोको आंदोलन