खा.सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त जवळार्जून येथे मोफत नेत्र तपासणी

अमोल भोसले,उरुळी कांचन

बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जवळार्जुन (ता. पुरंदर ) येथील अजित युवा प्रतिष्ठान, अजिंक्य अशोकराव टेकवडे मित्र परिवार आणि जवळार्जुन ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जवळार्जुन पंचक्रोशीतील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


कोरोना संबंधित सर्व नियमांचे पालन करत पुरंदर हवेलीचे मा. आमदार अशोक टेकवडे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष माणिक झेंडे पाटील, जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, राष्ट्रवादी कॉंग्रेस उपाध्यक्ष संदीप चिकणे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र धुमाळ, खासदार सुप्रिया सुळे यांचे सहाय्यक मयुर जगताप तसेच जवळार्जुन ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य – अजित युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांच्या उपस्थितीत जवळार्जुन मधील जि.प. प्राथमिक शाळेमधील महिला अस्मिता भवन मध्ये हा कार्यक्रम पार पडला.यावेळी पंचक्रोशीतील अनेक नागरिकांनी सहभागी होत नेत्र तपासणी करून घेतली.

शिबिरामध्ये एकूण ८१५ जणांचे मोफत तपासणी केली गेली आणि ५८५ जणांना मान्यवरांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी तपासणी मध्ये २७ जणांना मोतीबिंदू असल्याचे आढळून आले. मोतीबिंदू असलेल्या २७ जणांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया लवकरच करण्यात येणार असल्याचे अजिंक्य टेकवडे यांनी सांगितले.


यावेळी जवळार्जुन ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ कणसे, सदस्य सचिन टेकवडे, संगीता राणे, संगीता टेकवडे , पोलीस पाटील श्रीकांत राणे, महेंद्र लोणकर, ग्रामस्थ सुधाकर टेकवडे, रामभाऊ राणे, सुजित राणे, शशिकांत टेकवडे आणि इतर मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिरासाठी डॉ. रणवरे,डॉ.तमन्ना शेख यांचे विशेष सहकार्य लाभले.

Previous articleऔद्योगिक क्षेत्रातील भूसंपदानात भेडसावणाऱ्या समस्यांचा निपटारा होण्यासाठी उद्योगमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
Next articleमाजी सभापती सुजाता पवार यांच्या नेतृत्वाखाली खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांची आरोग्य तपासणी