सडक संस्थेच्या वतीने कोरोना जनजागृती

दिनेश पवार,दौंड

दौंड येथील सडक या संस्थेच्या वतीने कोरोना च्या तिसऱ्या लाटेत काळजी कशी घ्यावी याबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात डॉ.विशाल मिसाळ यांनी मार्गदर्शन केले.कोरोना च्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांची काळजी कशी घ्यावी याविषयी त्यांनी माहिती दिली.


संस्थेच्या प्रमुख सिस्टर ऑलिव्ह यांनी संस्थेच्या माध्यमातून निराधार व गरजू न साठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती दिली. सडक ही संस्था दौंड मध्ये निराधार व गरजूसाठी काम करते या संस्थेच्या वतीने मुलामुलींना पौष्टिक आहार देण्याचा उपक्रम राबविला जातो.

तसेच त्यांचे शालेय साहित्य.खेळण्यासाठी आवश्यक साहित्य दिले जाते त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.या संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रम वेळोवेळी राबविले जातात.या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या प्रमुख सिस्टर ऑलिव्ह, कुटीनो मिस,युनूस पानसरे,फिरोज पठाण यांनी केले होते.

Previous articleकुरवंडी येथे कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रम संपन्न
Next articleसरपंच परिषदेच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट