कुरवंडी येथे कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रम संपन्न

प्रमोद दांगट , निरगुडसर

एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन पीक संरक्षण तसेच कृषी विभागाच्या विविध विकास योजना याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व माहिती मिळावी यासाठी मंगळवार (दि.29) रोजी कुरवंडी ( ता.आंबेगाव ) येथे सकाळी दहा वाजता कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे ज्ञानेश्वर बोटे हे होते .यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की रोजगार हमी योजने अंतर्गत शेततळे ,फळबाग लागवड ,गांडूळ शेड नाडेप , विहीर पुनर्भरण यासह कृषी विभागामार्फत असलेल्या सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा त्यासाठी जवळील कृषी अधिकारी व कार्यालयातील अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करावा असे त्यांनी आवाहन केले.


या कार्यक्रमाचे आयोजन मंडळ कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ यांनी केले होते.या कार्यक्रम प्रसंगी तालुका कृषी अधिकारी चौधरी साहेब यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली तर नारायणगाव कृषी विज्ञान केंद्र येथील डॉ.टेमकर यांचे व्याख्यान झाले.प्रगतिशील शेतकरी कैलास तोत्रे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रमिला मडके यांनी जास्ती जास्त कृषि विभागाच्या योजनाचा लाभ शेतकरी वर्गानी घ्यावा असे अहवान केले त्याच्या कामाचे कौतूक बोटे साहेब यांनी भरभरुन केले.

यावेळी खेड उपविभागीय कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे ,सरपंच मनिषाताई तोत्रे ,उपसरपंच जितेंद्र तोत्रे, शेतकरी नितीन तोत्रे,आशा गटे, सारिका वाघमारे ,कैलास तोत्रे, महेश तोत्रे , रवींद्र तोत्रे,अधिकारी नमिता नाटे ,दिपाली धीमटे, सुजाता केदारी, छाया शिंदे, रूपाली शिंदे ,साधना डेंगळे, वैशाली मिडगुले, नेहा विरणक,कराळे सर ,पवार मॅडम,महेश सर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपसरपंच जितेंद्र तोत्रे यांनी आभार मानले.

Previous articleरिंगरोड विरोधी कृती समितीच्या वतीने उपोषण : पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांची रिंग रोड रद्द करण्याची मागणी
Next articleसडक संस्थेच्या वतीने कोरोना जनजागृती