रिंगरोड विरोधी कृती समितीच्या वतीने उपोषण : पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांची रिंग रोड रद्द करण्याची मागणी

अमोल भोसले,उरुळी कांचन

पुर्व हवेलीतील बाधित शेतकरी राजेंद्र चोरघे, प्रल्हाद वारघडे पाटील, रिंगरोड दिलासा संस्थाचे सचिव प्रभाकर कामठे यांच्या नेतृत्वाखाली हवेली पूर्व आणि पश्चिम गावातील बाधित शेतकरी उपोषण सुरु केले. रिंग रोडला स्पष्ट विरोध दर्शविण्यासाठी गाथा वाचन करून निषेध दर्शविला.

बकोरी, तुळापूर, डोंगरगाव हि पूर्व हवेलीतील तर पश्चिम मधून रहाटवडे गावानी प्रथम आपला विरोध दर्शविला यात महिला प्रतिनिधीनी ही आंदोलनात सहभाग नोंदविला. अधिकारी, शेतकऱ्यांना बाजू न ऐकून घेता दडपशाही करत असून मानवी अधिकारांची आणि कायदे व्यवस्था मोडून सूडबुद्धीने रिंग रोड बाधितांना वागवत आहेत. पुढे हवेली पूर्व आणि पश्चिम मधील उर्वरित गावे क्रमाने या लढ्यात आपला विरोध दर्शविणार आहेत अशी माहिती प्रभाकर कामठे,प्रल्हाद वारघडे पाटील आणि राजेंद्र चोरघे यांनी दिली. प्रसंगी पंचायत समितीचे सदस्य श्याम गावडे, महाराष्ट्र राज्य माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे पाटील, ग्रामपंचायत सदस्य अमित गोते, रिंगरोड दिलासा संस्थाचे सदस्य विजय पायगुडे, ज्ञानेश्वर वारघडे, अक्षय शिवले, उमेश शिवले, पंडीत गावडे, पंडित पायगुडे, आप्पासाहेब तांबे आणि साधना जितेंद्र चोरघे, ललिता महेंद्र चोरघे, संदीप चोरघे, रामदास चोरघे, हभाजी चौधरी, बाळासाहेब जाधव हे पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.

रिंग रोड विरोध कृती समिती हवेलीसह, खेड, मावळ, मुळशी, पुरंदर, भोर हे सर्व तालुके आपापल्या तालुक्यात उपविभागीय अधिकारी कार्यलयात आंदोलन करुन विरोध दर्शवत आहेत. संपूर्ण जिल्ह्यात प्रकल्पाला मोठा विरोध होत असून रिंग रोड रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे.

Previous articleसुधागडवर डॉक्टरांना आणि त्यांच्या कार्याला सलाम करीत तिरंगा फडकाविला
Next articleकुरवंडी येथे कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रम संपन्न