टेकवडी येथे रोजगार हमी योजने अंतर्गत शोषखड्डे आणि वृक्ष संवर्धन उपक्रमाची लोकसहभागातून सुरुवात

चाकण- पर्याय प्रतिष्ठान व ग्रामपंचायत टेकवड़ी यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार हमी योजने अंतर्गत शोषखडडे आणि व्रक्ष संवर्धन उपक्रमाची लोकसहभागातून सुरुवात करण्यात आली.


पर्याय प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन बाजारे यांनी ग्रामस्थ, पदाधिकारी, गावातील तरुणांना रोजगार हमी योजना, घर तेथे शोषखड्डे योजना, वृक्ष संवर्धनाचा बिहार पॅटर्नची सविस्तर माहिती दिली.सरपंच विठ्ठल शिंदे यांनी गावातील सर्व कुटुंब यांचे जॉब कार्ड काढून या कार्यक्रमाला गती देणार असल्याचे सांगितले.

यावेळी उपसरपंच ज्ञानेश्वर बेंदुरे ,दिलीप बेंदुरे,दत्तात्रय शिर्के,अविनाश कावड़े, आकाश जाचक,मोहन बेंदुरे, बबन बेंदुरे , शंकर बेंदुरे इत्यादि मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाला हनुमंतराव देवकर वरिष्ठ पत्रकार व संपादक महाबुलेटिन न्यूज़, हभ प शरद महाराज थोरात, नवनाथ थोरात या मान्यवरानी भेट दिली तसेच सवांद साधला.आभार प्रदर्शन दिलीप बेंदुरे सर यांनी केले.

Previous articleठेकेदार व अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराची पोलखोल
Next articleसुधागडवर डॉक्टरांना आणि त्यांच्या कार्याला सलाम करीत तिरंगा फडकाविला