आस्था फाउंडेशनच्या वतीने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

आंबेगाव- येथील नामदेवराव मारुती नंदकर अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेला ७ व्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्य साधून ११ हजार ५०० वह्यांचे वाटप आस्था फाऊंडेशन, चाकण यांच्याकडून करण्यात आले.

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आपल्या संस्थेकडून मदत व्हावी या उद्देशाने वह्यांचे वाटप केले असल्याचे याप्रसंगी आस्था फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तेजस मुंगसे यांनी सांगितले.

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने आसपासच्या विद्यार्थ्यांना बोलावून व कोरोनाचे नियम पाळत काही विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले असून उर्वरित विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप शाळा सुरू झाल्यानंतर करण्यात येईल असे मुख्याध्यापक सुनील पोटे यांनी सांगितले.

याप्रसंगी आस्था फाऊंडेशनचे संजय टोपे, सचिन थेऊरकर, किशोर तळपे, हृषीकेश देवकर, ज्ञानदीप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव नंदकर, सुरज नंदकर,  प्रा. मुख्याध्यापक सोपान फटांगरे, खंडू कारंडे, महेश डुंबरे आदी उपस्थित होते.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वह्या उपलब्ध करून दिल्याबद्दल आश्रमशाळेच्या वतीने आस्था फाऊंडेशनचे  संजय टोपे, तेजस मुंगसे, श्रीपती कर्माळे, ऋषिकेश देवकर, सचिन थेऊरकर, किशोर तळपे, तुषार अल्हाट, सत्यवान पोटावडे, विक्रम करजखेले, अमर जाधव, सचिन कुंभार, भगवान साळुंखे, डॉ. दादासाहेब गारगोटे, सोमनाथ टोपे या पदाधिकाऱ्यानी विशेष सहकार्य केलं, त्याबद्द्ल त्यांचे आभार मानण्यात आले.

Previous articleवृक्षारोपण निसर्गाचीच नव्हे तर समाजाची गरज- सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर कल्याणराव विधाते
Next articleठेकेदार व अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराची पोलखोल